इंडियन प्रीमिअर लीग 2022 स्पर्धेची ट्रॉफी जिंकणारा गुजरात टायटन्स संघ आयपीएल 2023 स्पर्धेतही तुफान फॉर्ममध्ये आहे. कर्णधार हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वाखालील गुजरात संघाने गुणतालिकेत पहिल्या स्थानी राहून प्ले-ऑफमध्ये थाटात एन्ट्री केली होती. अशात मंगळवारी (दि. 23 मे) आयपीएल 2023चा पहिला क्वालिफायर सामना चेपॉक स्टेडिअममध्ये चेन्नई सुपर किंग्स वि. गुजरात टायटन्स संघात खेळला जाणार आहे. या सामन्यात पंड्यासेना विजय मिळवून अंतिम सामन्यात एन्ट्री करण्याचा प्रयत्न करेल. अशात या लेखात आपण ती 3 कारणे जाणून घेऊयात, ज्यामुळे गुजरात सीएसके संघाला सहजरीत्या पराभूत करून अंतिम सामन्यात प्रवेश करू शकतो.
गुजरात टायटन्स अंतिम सामन्यात प्रवेश करू शकण्याची 3 कारणे
1. चेन्नईविरुद्ध गुजरातचे पारडे जड
चेन्नई सुपर किंग्स वि. गुजरात टायटन्स संघातील आमने-सामने आकडेवारी पाहिली, तर दोन्ही संघात एकूण 3 टी20 सामने खेळले गेले आहेत. या तिन्ही सामन्यात गुजरात संघाला विजय मिळवण्यात यश आले आहे. दोन्ही संघ मागील हंगामात दोन वेळा आणि या हंगामात एक वेळा आमने-सामने आले होते. या सामन्यात गुजरातने चेन्नईला पराभवाचा धोबीपछाड दिला. अशात चेन्नईविरुद्ध गुजरातचे पारडे जड दिसत आहे.
2. घरच्या मैदानात खास नाही राहिले चेन्नईचे प्रदर्शन
चेन्नई सुपर किंग्स संघाचे घरचे मैदान असलेल्या एमए चिदंबरम स्टेडिअम (MA Chidambaram Stadium) येथे सीएसके (CSK) संघासाठी आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेचा हंगाम चांगला ठरला नाही. संघाने या हंगामात चेपॉक (Chepauk) स्टेडिअमवर एकूण 7 सामने खेळले, त्यापैकी 4 सामन्यात त्यांना विजय मिळवता आला. त्यांनी या हंगामात सरासरी कामगिरी केली आहे.
अशात घरच्या मैदानात चेन्नई संघ तितका फायदा उचलू शकला नाहीये, ज्यामुळे असे म्हटले जात आहे की, चेपॉकच्या मैदानावर एमएस धोनी (MS Dhoni) याच्या सेनेला पराभवाचा सामना करावा लागू शकतो. गुजरात संघाचे अनेक खेळाडू शानदार फॉर्ममध्ये आहेत, ज्यामुळे त्यांनी एमएस धोनी याच्या नेतृत्वाखालील चेन्नई संघाविरुद्ध विजय मिळू शकतो.
3. पर्पल कॅपच्या शर्यतीत गुजरातचे दोन खेळाडू अव्वलस्थानी
विशेष म्हणजे, गुजरात टायटन्स संंघासाठी दोन खेळाडू हुकमी एक्का ठरत आहेत. पर्पल कॅप शर्यतीत मोहम्मद शमी एकूण 14 सामन्यात 24 विकेट्स घेत पहिल्या स्थानी आहे. तसेच, दुसऱ्या स्थानी फिरकीपटू राशिद खान याच्या नावाचाही समावेश आहे. त्यानेही 24 विकेट्स नावावर केल्या आहेत. अशात हे दोघेही पहिल्या क्वालिफायर सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघासाठी डोकेदुखी ठरून गुजरातला अंतिम सामन्यात पोहोचण्यात मदत करू शकतात. (ipl 2023 qualifier 1 match csk vs gt 3 reasons why gujarat titans will enter the ipl 2023 final know here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धोनीचा रागराग करणाऱ्यांना हार्दिकने दोनच शब्दात केले गार; म्हणाला, ‘तसंच करायचंय ना मग…’
धोनी, हार्दिक, ईशान आणि कृणाल पंड्याने केली पार्टी? मुंबई प्लेऑफमध्ये पोहोचताच व्हिडिओ व्हायरल