इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत रविवारी (दि. 2 एप्रिल) डबल हेडरमधील (एका दिवशी दोन सामने) पहिला सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात रंगला. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडिअमवर रंगलेल्या या सामन्यात ‘वेगाचा बादशाह’ म्हणून ओळखला जाणारा उमरान मलिक चांगलाच चमकला. उमरानने आपल्या भेदक गोलंदाजीने राजस्थानच्या विस्फोटक युवा खेळाडूला त्रिफळाचीत केले. यादरम्यानचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
नाणेफेक गमावत राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघ फलंदाजीला उतरला होता. 139 धावांवर यशस्वी जयसवाल (Yashasvi Jaiswal) याच्या रूपात राजस्थानला दुसरा झटका बसल्यानंतर चौथ्या स्थानी देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal) फलंदाजीला उतरला होता. यावेळी सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघाचा वेगवान गोलंदाज उमरान मलिक याने त्याला 2 धावांवरच तंबूचा रस्ता दाखवला.
149 kph by Umran Malik to cleans up Padikkal 🔥 pic.twitter.com/mSS8RTKBjA
— Johns. (@CricCrazyJohns) April 2, 2023
A 149.3kmph cherry from Umran Malik to clean up Devdutt Padikkal. pic.twitter.com/ccvwnHRXxE
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 2, 2023
झाले असे की, राजस्थानच्या डावातील 15वे षटक उमरान टाकत होता. या षटकातील पहिल्याच चेंडूवर उमरानने इतका वेगवान चेंडू टाकला की, तो पडिक्कलला समजलाच नाही आणि थेट स्टंपला जाऊन लागला. यावेळी उमरानच्या चेंडूचा वेग ताशी 149.3 किमी इतका होता. यामुळे पडिक्कलला चकवत चेंडूने स्टंप उडवला. यावेळी स्टंपनेही कोलांटी उड्या मारल्या. यादरम्यानचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
.@umran_malik_01 doing Umran Malik things! 👍
Relive how he picked his first wicket of the #TATAIPL 2023 👇#SRHvRR | @SunRisers pic.twitter.com/QD0MoeW1vF
— IndianPremierLeague (@IPL) April 2, 2023
आयपीएलने हा व्हिडिओ अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 4 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच, चाहते या व्हिडिओवर कमेंट करत उमरानचे कौतुक करू लागले.
T. I. M. B. E. R! @umran_malik_01 scalps his first wicket of the match 👌 👌#RR three down as Devdutt Padikkal departs.
Follow the match ▶️ https://t.co/khh5OBILWy#TATAIPL | #SRHvRR pic.twitter.com/nE4MAUiOM5
— IndianPremierLeague (@IPL) April 2, 2023
राजस्थानने पार केला 200 धावांचा टप्पा
सामन्याविषयी बोलायचं झालं, तर हैदराबादचा कर्णधार भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) याने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने जोस बटलर (54), यशस्वी जयसवाल (54) आणि कर्णधार संजू सॅमसन (55) यांच्या तीन अर्धशतकांच्या जोरावर निर्धारित 20 षटकात 5 विकेट्स गमावत 203 धावा चोपल्या. यावेळी हैदराबादकडून गोलंदाजी करताना फजलहक फारुकी आणि टी नटराजन यांनी प्रत्येकी 2 विकेट नावावर केल्या. तसेच, उमरानच्या नावावर एक विकेट नोंदवली गेली. (ipl 2023 umran malik bowled devdutt padikkal video goes to viral srh vs rr)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
तीन अर्धशतकांसह राजस्थान ठरला 200चा टप्पा ओलांडणारा IPL 2023चा पहिला संघ, हैदराबादपुढे मोठे आव्हान
‘इम्पॅक्ट प्लेअर’ नियमावर डेविड वॉर्नर नाखुश? पराभवानंतर काय म्हणाला पाहाच