भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली इंडियन प्रीमियर लीग 2023मध्ये आरसीबीचे प्रतिनिधित्व करत आहे. धोनीच्या नेतृत्वात आरसीबीने अनेक आयपीएल हंगाम गाजवले. मात्र, सध्या विराट एक फलंदाज म्हणून आरसीबीसाठी खेळत आहे. सोमवारी (1 मे) लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात विराटच्या आरसीबीने 18 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात विराट आणि गौतम गंभीर यांच्यातील वाद देखील पाहायला मिळाला. दरम्यान, या सामन्यांतर विराट पत्नी अनुष्कासोबत देवदर्शनाला गेल्याचे समोर येत आहे.
मागच्या वर्षी आशिया चषकातून विराट कोहली आपल्या जुन्या फॉर्ममध्ये परतला. त्याआधीचे दोन वर्षी विराटसाटी एखाद्या भयानक स्वप्नाप्रमाणे म्हणता येतील. या दोन वर्षांमध्ये विराट खूपच निराशाजनक खेळी करताना दिसला होता. मागच्या वर्षी फॉर्ममध्ये परतण्याआधी विराटने अनेक देवांचे दर्शन घेतले होते. अशातच आता सोमवारी (1 मे) भारताचा माजी दिग्गज गौतम गंभीर () याच्याशी वाद झाल्यानंतर देखील विराट पुन्हा एकदा देवाचरणी माथा टेकवायला गेला आहे. सोबत त्याची पत्नी अनुष्का शर्माही दिसत आहे. विराट आणि अनुष्काचा हा नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
https://www.instagram.com/reel/CrwDzV-g166/?utm_source=ig_web_copy_link
दरम्यान, लखनऊविरुद्धच्या या सामन्यात पाहुण्या आरसीबीने 18 धावांनी विजय मिळवला. विराटने या सामन्यात 30 चेंडूत 31 धावा केल्या होत्या. तर आरसीबीचा कर्णधार 40 चेंडूत 44 धावा करून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता. विराटने सामन्यादरम्यान अफगाणिस्तानच्या नवीन उल हक आणि अमित मिश्रा यांच्याशी वाद घातला होता. सोबतच गौतम गंभीरला डिवचण्यासाठी कृणाल पंड्याचा झेल पकडल्यानंतर रिएक्शन देखील दिली होती. याच कारणास्तव सामना संपल्यानंतर गंभीर विराटशी वाद घालण्याच्या हेतूने मैदानात आला आणि त्याने तसे केलेही. तत्पूर्वी 2013मध्येही विराट आणि गंभीरमध्ये आयपीएल सामन्यादरम्यान वाद झाला होता.
विराटचे चालू आयपीएल हंगामातील प्रदर्शन पाहिले, तर त्याने 9 सामन्यांमध्ये 45.50च्या सरासरीने 364 धावा केल्या आहेत. नाबाद 82 धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी होती. चालू हंगामात विराटच्या बॅटमधून आतापर्यंत 34 चौकार आणि 11 षटकार पाहायला मिळाले आहेत. आरसीबीला आपला पुढचा सामना शनिवारी (6 मे) दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळायचा आहे. (Virat Kohli & Anushka Sharma visiting temple)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘वेगाचा बादशाह’ डेल स्टेनही झाला ईशांतच्या गोलंदाजीचा फॅन; म्हणाला, ‘मी आतापर्यंत कधीच…’
लखनऊविरुद्ध सामन्यात दीपक चाहरचे कमबॅक, नाणेफेक जिंकून धोनीने घेतली गोलंदाजी