IPLक्रिकेटटॉप बातम्या

IPL 2024 : ‘आला रे आला’, हार्दिक पांड्याचे मुंबई इंडियन्सच्या कॅपमध्ये जंगी स्वागत, पाहा व्हिडिओ

आयपीएलचा 17 वा हंगाम सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस बाकी राहिले आहेत.  यंदाच्या आयपीएलमध्ये मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. मुंबई इंडियन्स संघाच्या कर्णधारपदी हार्दिक पंड्या दिसणार आहे. तसेच मुंबई इंडियन्सने घेतलेल्या या निर्णयामुळे मुंबईचे चाहते नाराज झाले होते. कारण रोहित शर्मा याला कर्णधारपदावरून दूर करत त्यांनी हा मोठा निर्णय घेतलेला होता. यानंतर आता तो आयपीएल 2024 मध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे.

याबरोबरच सोमवारी तो त्याच्या मुंबई इंडियन्स संघात सामील झाला आणि त्याचे विशेष स्वागत करण्यात आले आहे. तसेच मुंबई संघात प्रथमच कर्णधार म्हणून प्रवेश केल्यानंतर त्याने सर्वप्रथम देवाला पुष्प अर्पण करून पुष्पहार अर्पण केला आहे. तसेच संघाचे मुख्य प्रशिक्षक मार्क बाउचर यांनी नारळ फोडला आहे. याबाबत मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याच्या स्वागताचा व्हिडिओ त्यांच्या ट्टिटर हँडलवर शेअर केला आहे.

यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. या पोस्टवर रोहित शर्माच्या चाहत्यांचा राग स्पष्टपणे दिसत होता. तसेच 24 मार्चपासून मुंबई इंडियन्स संघाचा आयपीएल प्रवास सुरू होणार आहे. तर या सामन्यात हार्दिक पांड्याचा सामना त्याच्या जुन्या संघ गुजरात टायटन्सशी होणार आहे. याशिवाय 7 एप्रिलपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकात संघ फक्त चार सामने खेळणार आहे.

 

मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएल 2024 साठी:- रोहित शर्मा, डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, इशान किशन, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, विष्णू विनोद, अर्जुन तेंडुलकर, शम्स मुलानी, नेहल वढेरा, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, पीयूष चावला, आकाश मधवाल, जेसन बेहरेनडॉर्फ, रोमा, रोहित ब्रेव्हिस. हार्दिक पांड्या (C), जेराल्ड कोएत्झी, दिलशान मदुशंका, श्रेयस गोपाल, नुवान तुषारा, नमन धीर, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शिवालिक शर्मा.

महत्त्वाच्या बातम्या-

Related Articles