जगातील सर्वात मोठी व्यावसायिक टी20 लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल स्पर्धेचा सोळावा हंगाम मे महिन्यात समाप्त झाला. जगातील या सर्वात मोठ्या स्पर्धेच्या पुढील हंगामाची तयारी देखील सुरू झाली आहे. स्पर्धेचा लिलाव डिसेंबर महिन्यात होणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे. मात्र, पुढील वर्षी ही स्पर्धा भारताबाहेर होण्याची शक्यता वर्तवली जातेय.
पुढील वर्षी आयपीएल भारताबाहेर होण्याचे महत्त्वाचे कारण हे देशात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका आहेत. पुढील वर्षी मार्च ते मे यादरम्यान भारतात लोकसभा निवडणुका पार पडतील. त्यामुळे आयपीएलचा हंगाम भारताबाहेर होऊ शकतो. आयपीएलवेळी मोठ्या प्रमाणात सुरक्षेची आवश्यकता असते. त्यामुळे केंद्र सरकार एकाच वेळी निवडणूक व आयपीएलसाठी सुरक्षा पुरविण्यातसाठी असमर्थ असल्याचे सांगू शकते.
यापूर्वी लोकसभा निवडणुकांमुळे दोन वेळा आयपीएल भारताबाहेर आयोजित केली गेली. 2009 निवडणुकांवेळी ही स्पर्धा पूर्णपणे दक्षिण आफ्रिकेत खेळवली गेलेली. तर, 2014 मध्ये अर्धा हंगाम युएईमध्ये पार पडलेला. 2020 चा संपूर्ण हंगाम तर 2021 चा अर्धा हंगाम हा देखील युएईत खेळला गेला होता. त्यामुळे पुन्हा एकदा स्पर्धा भारताबाहेर झाल्यास भारतीय प्रेक्षक नाराज होऊ शकतात.
आयपीएलचा विचार केल्यास दोन वर्षांनंतर यावर्षीच आयपीएल सर्व संघ आपापल्या मैदानावर खेळले होते. त्यामुळे पुन्हा एकदा घरच्या परिस्थितीचा फायदा घेण्याची संधी संघांची हुकणार आहे. बीसीसीआय व केंद्र सरकार यांच्या दरम्यान याच मुद्द्यावर या वर्षाखेरीस चर्चा होईल. त्यानंतर जो निर्णय होईल त्या ठिकाणी स्पर्धा खेळली जाईल.
(IPL 2024 Might Shifted To UAE Or South Africa Due To General Election)
महत्वाच्या बातम्या –
एअर होस्टेसनं पार केली हद्द! धोनी झोपेत असताना काढला व्हिडिओ, चाहत्यांचा आक्षेप
‘अँडरसन-ब्रॉडची जोडी नेहमी स्मरणात राहील’, द्रविडने सांगितले इंग्लिश दिग्गजाचे संघातील महत्व