आयपीएल 2025 च्या रिटेन्शन नियमाबाबत सस्पेंस अजूनही कायम आहे. या नियमांची घोषणा कधी होईल, याची चाहते आतुरतेनं वाट पाहत आहेत. मात्र बीसीसीआयनं अद्याप या संबंधी काहीही अपडेट दिलेलंं नाही.
दरम्यान, आता रिटेन्शन नियमांबाबत एक मोठी बातमी समोर आलेली आहे. रिपोर्ट्सनुसार, आयपीएल रिटेन्शन नियमांच्या घोषणेला आणखी थोडा उशीर होऊ शकतो. हे नियम जाणून घेण्यासाठी सप्टेंबरच्या अखेरपर्यंत वाट पाहावी लागू शकते.
वास्तविक, 29 सप्टेंबरला बंगळुरूत बीसीसीआयची वार्षिक बैठक होणार आहे. ‘क्रिकबझ’च्या रिपोर्टनुसार, या दिवशी आयपीएल 2025 च्या रिटेन्शन नियमांची घोषणा केली जाऊ शकते. तसं पाहिलं तर, बीसीसीआयची वार्षिक बैठक आणि आयपीएलची पॉलिस यांमध्ये काहीही सरळ संबंध नाही. मात्र आयपीएलच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हे नियम जाहीर होण्यासाठी आणखी कमीत कमी 10 दिवस किंवा 2 आठवड्यांचा कालावधी लागू शकतो. बीसीसीआनं सर्व फ्रेच्यायझींना नियमांच्या घोषणेत विलंब होणार असल्याची माहिती दिली आहे.
बीसीसीआय यापूर्वी ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस रिटेंशन नियमांची घोषणा करणार होती. मुंबईत झालेल्या बैठकीत या संबधी जवळपास निर्णय झाला होता. मात्र यानंतर फ्रँचायंझी अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर बीसीसीआयनं याला स्थगिती दिली. ‘क्रिकबझ’च्या रिपोर्टनुसार, सर्व फ्रँच्यायझींकडे आपल्या रिटेन केलेल्या खेळाडूंची लिस्ट देण्यासाठी 15 नोव्हेंबरपर्यंतचा वेळ असेल. यानंतर डिसेंबर महिन्यात मेगा लिलाव होऊ शकतो. यामध्ये राईट टू मॅच (RTM) निश्चितपणे असेल.
येथे नमूद करण्यासारखी बाब म्हणजे, मुंबईतील बैठकीत रिटेंशन नियमांवरून आयपीएल फ्रँच्यायझींच्या मालकांमध्ये वादावादी झाल्याची बातमी आली होती. काही संघांना जास्त रिटेंशन हवे होते, तर काही संघ कमी रिटेंशनच्या समर्थनात होते.
हेही वाचा –
स्टाईल मारायला गॉगल घालून आला, शून्यावर बाद होऊन तंबूत परतला! भारताच्या स्टार खेळाडूची फजिती
सर्व 11 खेळाडूंनी मिळून फलंदाजाला घेरलं, अशी फिल्डिंग कधी पाहिली का? ; व्हिडिओ व्हायरल
बांग्लादेशला हरवण्यासाठी पाकिस्तानचा माजी प्रशिक्षक भारतीय संघात; चेन्नईत जोरदार तयारी