---Advertisement---

चौथ्या पराभवानंतर हार्दिक पांड्याचं ‘हे’ हृदयस्पर्शी वक्तव्य, म्हणाला….

---Advertisement---

आयपीएल 2025 च्या 20 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) ने मुंबई इंडियन्सचा 12 धावांनी पराभव केला. यासह, आरसीबीने 10 वर्षांनी मुंबईचा किल्ला तोडला. याआधी, 2015 मध्ये मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आरसीबीने शेवटचा विजय मिळवला होता.

प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पाच विकेट गमावून 221 धावा केल्या. आरसीबीकडून विराट कोहली आणि रजत पाटीदार यांनी शानदार अर्धशतके झळकावली. मुंबईकडून कर्णधार हार्दिक पांड्याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. आरसीबीच्या प्रचंड धावसंख्येच्या प्रत्युत्तरात, मुंबई इंडियन्सना 9 विकेट्स गमावल्यानंतर फक्त 209 धावा करता आल्या. मुंबईकडून तिलक वर्माने 29 चेंडूत 53 धावा केल्या तर हार्दिक पांड्याने 15 चेंडूत 42 धावा केल्या. आरसीबीकडून कृणाल पांड्याने चार तर यश दयाल आणि जोश हेझलवूडने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

घरच्या मैदानावर मुंबईच्या पराभवामुळे कर्णधार हार्दिक पांड्या खूप निराश आणि भावनिक दिसत होता. त्याच्या चेहऱ्यावर पराभवाचे दुःख स्पष्टपणे दिसून येत होते. मुंबईला हरवल्यानंतर, आरसीबीचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्या त्याचा भाऊ हार्दिककडे आला आणि त्याला मिठी मारून त्याचे सांत्वन केले.

आरसीबीकडून पराभव झाल्यानंतर हार्दिक म्हणाला की, मैदान फलंदाजीसाठी चांगलं होतं. आम्ही दोन मोठे फटके मारायला कमी पडलो. यापेक्षा जास्त काय बोलायचं मला कळत नाही. गोलंदाजांना गोलंदाजी करणं कठीण होतं. फक्त एवढंच सांगेन की, १२ धावा कमी असत्या तर निकाल वेगळा लागला असता. मागच्या सामन्यात रोहित खेळला नाही म्हणून आम्ही नमनला वर पाठवलं. रोहित परत आला म्हणून त्याला खाली पाठवावं लागलं. मागच्या सामन्यातून तिलकबद्दल खूप चर्चा झाली, पण तो एक रणनीतीचा भाग होता. पण आज त्याने खूप छान खेळ केला. आम्ही चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---