क्रिकेटटॉप बातम्या

IPL 2025 UPDATE; पहिल्या आणि अंतिम सामन्याचे ठिकाण ठरले, या मैदानावर रंगणार प्लेऑफ्सचा थरार

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2025 बाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या स्पर्धेचा पहिला आणि शेवटचा सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्स येथे खेळवला जाईल. आगामी स्पर्धा 21 मार्चपासून सुरू होईल. आयपीएलचा शेवटचा हंगाम कोलकाता नाईट रायडर्सने जिंकला होता. त्यामुळे या हंगामातील पहिला सामना त्याच्या घरच्या मैदानावर खेळवला जाईल. यावेळी सर्व संघांमध्ये मोठे बदल दिसून येतील.

क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, आयपीएल 2025चा पहिला सामना 21 मार्च रोजी आणि अंतिम सामना 25 मे रोजी खेळवला जाईल. या हंगामात एकूण 74 सामने होतील. विशेष म्हणजे स्पर्धेचा पहिला सामना ईडन गार्डन्सवर होणार आहे. आणि अंतिम सामनाही येथेच खेळवला जाईल. प्लेऑफ सामन्यांबद्दल बोलयचे झाले तर हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर दोन सामने खेळवले जातील.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) टीम आयपीएलच्या वेळापत्रकावर काम करत आहे. यापूर्वी ही स्पर्धा 14 मार्चपासून होणार होती. पण आता ही तारीख 21 मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे. स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक कधी जाहीर होईल याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही. पण रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआय लवकरच संपूर्ण वेळापत्रक जाहीर करू शकते.

या वर्षी फेब्रुवारी आणि मार्च हे महिने क्रिकेटच्या दृष्टीने खूप मनोरंजक असणार आहेत. फेब्रुवारीमध्ये दोन स्पर्धा सुरू होतील. एका वृत्तानुसार, महिला प्रीमियर लीग फेब्रुवारीपासून खेळवली जाईल. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 देखील या महिन्यात सुरू होईल. 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर मार्चपासून आयपीएल सुरू होईल. चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना 9 मार्च रोजी खेळवला जाईल.

हेही वाचा-

खराब फाॅर्ममधून जाणारा रोहित शर्मा रणजी ट्रॉफीमध्ये परतणार, चक्क इतक्या वर्षांनी स्पर्धेत खेळणार
‘या’ 3 भारतीय खेळाडूंनी चॅम्पियन्स ट्राॅफीमध्ये केले सर्वाधिक वेळा नेतृत्व
Champions Trophy; भारत-पाकिस्तान सोडून सर्व संघांची घोषणा, जाणून घ्या 6 संघांचे स्क्वाड

Related Articles