इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2023च्या छोट्या प्रकारचा लिलाव शुक्रवारी (23 डिसेंबर) कोचीन येथे होणार आहे. या लिलावामध्ये एकूण 405 खेळाडू सहभागी आहेत. ज्यामध्ये 273 भारतीय आणि 132 विदेशी खेळाडूंचा भरणा आहे. यांवर एकूण 200 कोटी रुपये खर्च केले जातील. या लिलावामध्ये सर्वच सर्व म्हणजे 10 फ्रॅंचायजी भाग घेणार आहे. मागील लिलावत 550 कोटी रुपये खर्च केले गेले होते. आता त्यामध्ये 350 कोटी रुपये कमी झाले, याचे कारण जाणून घेऊ.
मागील वर्षी झालेला लिलाव मोठा होता, जे बीसीसीआय दर 5 वर्षांनी घेते. त्यावेळी जवळपास 4 खेळाडूंना रिटेन (कायम) करण्याची संधी होती. तसेच लखनऊ आणि गुजरात हे दोन नवे संघ जोडले गेले होते. आताच्या लिलावमध्ये मात्र सर्वोत्तम खेळाडू रिटेन केले गेले. काहींना मुक्त केले गेले. यामुळे प्रत्येक संघाकडे 95 कोटी रुपये होते. मग संघ जसजसा खेळाडू कमी-अधिक करत जातो त्याचा परिणाम पाकिटातील रकमेवर झाला.
आयपीएलच्या नियमानुसार, प्रत्येक संघामध्ये जवळपास एकूण 25 खेळाडू असू शकतात. त्यातील 8 पेक्षा अधिक विदेशी खेळाडू असू शकत नाही. सर्व संघांनी मिळून 163 खेळाडू रिटेन केले आहेत. ज्यामध्ये 50 विदेशी खेळाडू आहेत. कोचीमध्ये होणाऱ्या लिलावात 87 खेळाडू खरेदी केले जातील. यामध्ये 30च्या आसपास विदेशी खेळाडू खरेदी केले जातील. या लिलावात एकूण 206.5 कोटी रुपये खर्च केले जातील. या लिलावासाठी हैद्राबादकडे सर्वाधिक असे 42.25 कोटी रुपये आहेत, तर कमी कोलकाता नाईट रायडर्सकडे आहेत. त्यांच्या पाकिटात 7.05 कोटी रुपये आहेत.
या लिलावात इंग्लंडचे सर्वाधिक 27 खेळाडू आहेत. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचे 22, ऑस्ट्रेलियाचे 21, वेस्ट इंडिजचे 20 खेळाडू आहेत. श्रीलंका आणि न्यूझीलंडचे प्रत्येकी 10-10 खेळाडू आहेत. तर सर्वात कमी नेदरलॅंड आणि युएईचे आहेत. या दोन्ही संघाचे 1-1 खेळाडू आहेत. तसेच अफगाणिस्तानचे 8 खेळाडू आहेत.
कोणाकडे किती रक्कम शिल्लक?
कोलकाता नाईट रायडर्स- 7.05 कोटी
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर- 8.75 कोटी
राजस्थान रॉयल्स- 13.2 कोटी
गुजरात टायटन्स-19.25 कोटी
दिल्ली कॅपिटल्स- 19.45 कोटी
चेन्नई सुपर किंग्ज- 20.45 कोटी
मुंबई इंडियन्स- 20.55 कोटी
पंजाब किंग्स- 32.20 कोटी
लखनऊ सुपर जायंट्स- 23.35 कोटी
सनरायजर्स हैदराबाद- 42.25 कोटी
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धोनीच्या बाबतीत जे पहिल्या सामन्यात झालं तेच शेवटच्याही!
BANvIND: दुसऱ्या दिवशीच्या सुरूवातीलाच भारताला दोन धक्के, राहुल-गिल स्वस्तात ‘आऊट’