fbpx
Thursday, January 28, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कोल्हापूरात रोहित- धोनी फॅन्सची कुस्ती रंगात

September 21, 2020
in क्रिकेट, IPL, टॉप बातम्या
0
Photo Courtesy: Twitter/IPL

Photo Courtesy: Twitter/IPL


अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला आयपीएलचा १३ वा हंगाम अखेर १९ सप्टेंबरपासून सुरु झाला. या हंगामातील पहिलाच सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स संघात पार पडला. हे दोन्ही संघ आयपीएलमधील सर्वोत यशस्वी संघ आहेत. तसेच या दोन्ही संघात नेहमीच काँटे की टक्कर पहायला मिळते. एवढेच नाही तर या दोन्ही संघांना कट्टर चाहत्यांचाही पाठिंबा दरवर्षी मिळत असतो. हे चाहते अनेकदा एकमेकांशी सोशल मीडियावर भांडताना दिसून येतात. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स व चेन्नई सुपर किंग्जच्या चाहत्यांमध्ये जे वाद होतात, तसे वाद सहसा इतर संघातील चाहत्यांमध्ये दिसत नाहीत.

काही दिवसांपूर्वीच कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड येथे एमएस धोनी आणि रोहित शर्माच्या चाहत्यांमध्ये मोठे भांडण झाले होते. आता कोल्हापूर जिल्ह्यातीलच राधानगरीतील मार्केट चौकात पोस्टर वॉर पहायला मिळाले आहे. यातील काही पोस्टर चेन्नई सुपर किंग्सच्या चाहत्यांनी तर काही मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांनी लावले आहेत. या पोस्टर्सवर चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनी आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माचे फोटो दिसून येत आहेत.

तसेच यातील मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांनी लावलेल्या एका पोस्टरवर ‘जल मत बराबरी कर’ असे लिहिलेले दिसते. तर दुसऱ्या एका पोस्टरवर ‘आण्णा म्हणत्यात सलाम ठोकत्यात’ असे लिहिले आहे. तसेच चेन्नई सुपर किंग्सच्या चाहत्यांनी लावलेल्या पोस्टरसवर ‘साहेब’ असे तर दुसऱ्या पोस्टरवर ‘आण्णा गेले बंबात’ असे लिहिलेलेल दिसून आले आहे. या पोस्टरचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.

कोल्हापुरात सगळच भारी असतय#म #मराठी #kolhapur #IPL2020 @rahulkhichadi pic.twitter.com/R2xGoGqVOg

— Santosh (@KanmuseSantosh) September 21, 2020

काही दिवसांपूर्वी कोल्हापूर जिल्हातील कुरंदवाड येथे एमएस धोनी आणि रोहित शर्मा यांच्या चाहत्यामध्ये भांडण झाले होते. हे भांडण इतके वाढले की एका चाहत्याने उसाच्या शेतात नेऊन एकाला मारहाण केली होती.  वास्तविक, दोन्ही खेळाडूंचे चाहते त्यांच्या संबंधित खेळाडूंचे पोस्टरसह रस्त्यावर फिरत होते. धोनीचे चाहते त्याच्या निवृत्तीमुळे तर रोहितच्या चाहते त्याची राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी निवड झाल्याने रस्त्यावर आले होते. दरम्यान, काही अज्ञात लोकांनी रोहित शर्माचे पोस्टर्स फाडले. त्यानंतर दोन्ही चाहते आपसात भिडले. दरम्यान, एका चाहत्याने शेतात जाऊन दुसऱ्याला जोरदार मारहाण केली.

या घटनेनंतर माजी भारतीय सलामीवीर वीरेंद्र सेहवागने अशी भांडणे करु नका, असा सल्लाही चाहत्यांना दिला होता.

महत्त्वाच्या बातम्या –

आज आयपीएलमध्ये विराट, विलियम्सनसह या खेळाडूंना आहे मोठे विक्रम करण्याची संधी

दिल्ली कॅपिटल्सच्या गोटात चिंतेचे वातावरण; आणखी एक मोठा खेळाडू झाला जखमी

भारतीय क्रिकेट वर्तुळात सर्वाधिक चर्चा होत असलेल्या रवी बिश्नोईचे झाले आयपीएल पदार्पण

ट्रेंडिंग लेख –

आयपीएलच्या मागील ३ हंगामातील रोहित शर्माची कामगिरी, घ्या जाणून

१३ वा आयपीएल हंगाम गाजवणार हे ३ भारतीय गोलंदाज, मिळणार सर्वाधिक बळी?

मुंबई इंडियन्स संघात असूनही कधीच खेळण्याची संधी न मिळालेले ६ स्टार खेळाडू

 


Previous Post

आज आयपीएलमध्ये विराट, विलियम्सनसह या खेळाडूंना आहे मोठे विक्रम करण्याची संधी

Next Post

स्टॉयनिस ठरला दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा हिरो, पण ट्रोल होतोय विराटचा आरसीबी संघ, का ते घ्या जाणून

Related Posts

Photo Courtesy: Twitter/@KKRiders
टॉप बातम्या

मुंबई टू टीम इंडिया व्हाया केरळ! भारतीय संघात नेट बॉलर म्हणून निवड झालेल्या संदीप वॉरियरचा संघर्षमय प्रवास

January 27, 2021
Screengrab: Instagram/@radhika_dhopavakar
टॉप बातम्या

क्वारंटाईनमध्ये रहाणे घालवतोय मुलीसोबत वेळ, पत्नीने शेअर केला गोड व्हिडिओ

January 27, 2021
Photo Courtesy: Twitter/@JamshedpurFC
टॉप बातम्या

आयएसएल २०२०-२१ : ब्लास्टर्सची जमशेदपूरची गोलशून्य बरोबरी

January 27, 2021
Photo Courtesy: Twitter/@englandcricket
टॉप बातम्या

वनक्कम टीम इंग्लंड! जो रूटचा संघ पोहोचला चेन्नईत

January 27, 2021
Photo Courtesy: Twitter/@TheRealPCB
टॉप बातम्या

कराची कसोटीत पाकिस्तानला आघाडी, फवाद आलमचे संघर्षपूर्ण शतक

January 27, 2021
Photo Courtesy: Twitter/ ICC
टॉप बातम्या

आयसीसी वनडे क्रमवारी : विराट-रोहितचे वर्चस्व अबाधित, बुमराह देखील ‘या’ स्थानी कायम

January 27, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/IPL

स्टॉयनिस ठरला दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा हिरो, पण ट्रोल होतोय विराटचा आरसीबी संघ, का ते घ्या जाणून

Photo Courtesy: Twitter/IPL

आज रंगणार रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध सनराइज हैद्राबाद सामना; जाणून घ्या सामन्याबद्दल सर्वकाही...

Photo Courtesy: Twitter/IPL

चेन्नई सुपर किंग्जसाठी आनंदाची बातमी; 'हा' खेळाडू संघात परतला

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.