आयपीएलच्या 13 व्या हंगामातील 38 वा सामना किंग्ज इलेव्हन पंजाब आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात मंगळवारी (20 ऑक्टोबर) दुबईमध्ये रात्री 7.30 वाजता होणार आहे.. रविवारी ( 18 ऑक्टोबर) आयपीएलच्या इतिहासातील एकमेव सामना खेळला गेला ज्याचा निकाल 2 सुपर ओव्हरनंतर लागला. हा सामना पंजाबने जिंकला होता. दिल्लीविरुद्ध होणाऱ्या सामन्यात विजय मिळवून पंजाबला या स्पर्धेत टिकून राहण्याची संधी आहे. त्याचवेळी दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरला सामना जिंकून प्ले ऑफमध्ये स्थान मिळवायचे आहे.
16 गुण मिळवून प्लेऑफमध्ये मिळेल स्थान
आयपीएलमध्ये 8 विजयांसह अर्थात 16 गुणांसह प्ले ऑफमध्ये संघाचे स्थान जवळजवळ निश्चित आहे. दिल्लीने या हंगामात आतापर्यंत 9 पैकी 7 सामने जिंकून 14 गुणांसह अव्वल स्थान गाठले आहे. त्याचबरोबर, 9 पैकी 3 सामने जिंकल्यानंतर पंजाब 7 व्या क्रमांकावर आहे.
या दोन्ही संघांनी हंगामात खेळला पहिला सुपर ओव्हर सामना
हंगामाचा पहिला सुपर ओव्हर दिल्ली-पंजाब दरम्यान खेळला गेला. वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाच्या शानदार गोलंदाजीमुळे दिल्लीने पंजाबचा पराभव केला. दुबईत खेळल्या गेलेल्या सामन्यात दोन्ही संघांनी 157 धावा केल्या. त्यामुळे सुपर ओव्हरनंतर सामन्याचा निर्णय लागला
राहुल-मयंक यांनी केल्या सर्वाधिक धावा
लीगमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पंजाबचा कर्णधार केएल राहुल आणि सहकारी सलामीवीर मयंक अगरवाल हे अव्वल स्थानी आहेत. राहुल (525 धावा) प्रथम क्रमांकावर आहे, तर मयंक (393 धावा) दुसर्या क्रमांकावर आहे.
रवी बिष्णोई आहे शानदार फॉर्ममध्ये
पंजाबचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि फिरकीपट रवी बिष्णोई उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत. शमीने या हंगामात आतापर्यंत 14 बळी घेतले आहेत. त्याचबरोबर रवी बिष्णोईने आतापर्यंत 9 फलंदाजांना बाद केले आहे.
दिल्लीत शिखर धवन आहे जबरदस्त फॉर्ममध्ये
दिल्लीचा सलामीवीर शिखर धवनने आपल्या संघासाठी सर्वाधिक 359 धावा केल्या आहेत. धवनच्या पाठोपाठ कर्णधार श्रेयस अय्यर आहे. अय्यरने हंगामात आतापर्यंत 321 धावा केल्या आहेत.
रबाडाने पर्पल कॅपवर कोरले नाव
पर्पल कॅपच्या शर्यतीत दिल्लीचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा सर्वात पुढे आहे. या हंगामात त्याने सर्वाधिक 19 बळी घेतले आहेत. यानंतर, दिल्लीकडून वेगवान गोलंदाज एन्रीच नॉर्किएने 12 बळी घेतले आहेत.
हवामान अहवाल आणि खेळपट्टीबद्दल माहिती
दुबईत आकाश स्वच्छ होईल. तापमान 22 ते 36 डिग्री सेल्सिअस दरम्यान असण्याची शक्यता आहे. येथील खेळपट्टी फलंदाजांना मदत करू शकते. येथे खेळपट्टी संथ गतीची असल्याने फिरकीपटूंना खूप मदत होईल. दुबईमध्ये नाणेफेक जिंकलेल्या संघाला प्रथम फलंदाजी करायला आवडेल. या आयपीएलपूर्वी येथे झालेल्या 61 टी20 सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाचा विजय मिळवण्याचा दर 55..74% होता.
दुबईमधील खेळपट्टीबद्दल माहिती
या मैदानावर झालेले एकूण टी20 सामने : 61
प्रथम फलंदाजी करताना मिळालेले विजय : 34
प्रथम गोलंदाजी करताना मिळालेले विजय : 26
पहिल्या डावात सरासरी धावसंख्या: 144
दुसर्या डावात सरासरी धावसंख्या: 122
आयपीएलमधील पंजाबचा विजय मिळवण्याचा दर आहे दिल्लीपेक्षा अधिक
आयपीएलमध्ये पंजाबचा विजय मिळवण्याचा दर पंजाबीपेक्षा अधिक आहे. दिल्लीने आतापर्यंत एकूण 186 सामने खेळले आहेत. त्यापैकी 84 सामने जिंकले आणि 100 सामने गमावले. 2 सामने अनिर्णित होते. लीगमध्ये दिल्लीचा विजय मिळवण्याचा दर 45.38% आहे. त्याचबरोबर पंजाबने आतापर्यंत एकूण 185 सामने खेळले आहेत. त्यापैकी 85 सामने जिंकले आणि 100 सामन्यात त्यांचा पराभव झाला. लीगमध्ये पंजाबचा विजय मिळवण्याचा दर 45.40% आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-तो पहिलाच इंग्लिश मॅन.! आयपीएलमध्ये ‘ही’ कामगिरी फक्त जॉस बटलरने केलीये
-स्मिथ ऐवजी बटलर बनणार कर्णधार? राजस्थान रॉयल्सने दिलंय ‘हे’ उत्तर
-‘करो या मरो’ सामन्यात राजस्थानने रोखला चेन्नईचा विजयरथ, प्लेऑफच्या आशा पल्लवित
ट्रेंडिंग लेख-
-कधी खेळली गेली होती पहिली सुपर ओव्हर? घ्या जाणून
-आयपीएल २०२०: असे ३ खेळाडू, ज्यांनी एक खेळी संघासाठी नाही तर स्वतःसाठी खेळली
-गोष्ट एका क्रिकेटरची भाग १४: भारताचा जंबो गोलंदाज ‘अनिल कुंबळे’