इंडियन प्रीमियर लीग 2023चा अंतिम सामना रविवारी (28 मे) खेळवला गेला नाही. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयोजित अंतिम सामन्यात ऐन वेळी पावसाने हजेरी लावली आणि सामना रद्द करावा लागला. पावसामुळे रविवारचा सामना सोमवारी (29 मे) खेळवला जात आहे. उभय संघांतील ही लढत सायंकाळी 7.30 वाजता सुरू होत आहे. त्याआधी नाणेफेकीचा कौल सीएसकेच्या बाजूने लागला आणि त्यांनी प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.
गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज साखळी फेरेतील अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर होते. आयपीएल 2023च्या क्वॉलिफायर एकमध्ये दोन्ही संघ आमने सामने होते. या सामन्यात सीएसकेने गुजरातला मात देत अंतिम सामन्यात आपली जागा पक्की केली. दुसरीकडे गुजरातला अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी क्वॉलिफायर दोन सामना जिंकवा लागला. क्वॉलिफायरन दोनमध्ये मुंबई इंडियन्सला गुजरातकडून पराभव स्वीकारावा लागला. सीएसकेने जर सोमवारी अंतिम सामन्यात विजय मिळवला, तर ही त्यांची पाचवी आयपीएल ट्रॉफी असेल. तर दुसरीकडे गुजरातकडे आफली सलग दुसरी ट्रॉफी जिंकण्याची संधी आहे.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
गुजरात टायटन्स: शुभमन गिल, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (कर्णधार), साई सुधारसन, विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, नूर अहमद, मोहम्मद शमी, मोहित शर्मा.
इम्पॅक्ट खेळाडू: जोश लिट्टे, शिवम मावी, ओडियन स्मिथ, साई किशोर, केएस भरत
चेन्नई सुपर किंग्ज: डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, मोईन अली, अंबाती रायुडू, रविंद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार/यष्टीरक्षक), दीपक चाहर, तुषार देशपांडे, महिशा थिक्षना, मथिशा पाथिराना.
इम्पॅक्ट प्लेअर्स: शिवम दुबे, मिचेल सँटनर, शुभ्रांशू सेनापती, शेख रशीद, आकाश सिंग.
(IPL Final, Gujarat Titans vs Chennai Super Kings Toss Result)
बातमी अपडेट होत आहे…
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतीय संघाच्या ‘या’ खेळाडूसाठी पुढील 6 ते 8 महिने खूपच महत्त्वाचे, दिनेश कार्तिकचे मोठे वक्तव्य
‘पाय पकडू नको भावा…’, IPL संपल्यानंतर अलीगडला पोहोचताच रिंकूने पुन्हा जिंकली चाहत्यांची मने, Video