fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

आयपीएलचे यश या ऑस्ट्रेलियन खेळाडूला खुपले; म्हणतो, आयपीएल तर पैसा कमवायचा धंदा

IPL is just Money grab it should not Preferred Over T20 World Cup say's Allan Border

ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू ऍलन बॉर्डर यांंनी आयपीएल आणि टी२० विश्वचषकावर मोठे विधान केेले आहे. ते म्हणाले की, आयपीएल केवळ पैसा कमावण्याचा व्यवसाय आहे. तसेच यावर्षी होणाऱ्या टी२० विश्वचषकाऐवजी आयपीएलला प्राधान्य देण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही.

कोरोना व्हायरसमुळे (Corona Virus) अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आलेला आयपीएलच्या १३ व्या हंगामाचे आयोजन ऑक्टोबर-नोव्हेंबरदरम्यान करण्याची शक्यता आहे.

बॉर्डर (Allan Border) यांनी एबीसीच्या ‘ग्रँडस्टँड कॅफे रेडिओ’च्या कार्यक्रमात म्हटले की, “मी या विचाराशी खुश नाही. स्थानिक स्पर्धेपेक्षा जागतिक स्पर्धांना महत्त्व दिले पाहिजे. त्यामुळे जर टी२० विश्वचषकाचे आयोजन झाले नाही, तर मला वाटत नाही की आयपीएलचे आयोजन होऊ शकते. मी या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार आहे.” तसेच “हा केवळ पैसा कमाविण्याचा व्यवसाय आहे. हे बरोबर नाही का?,” असा प्रश्नदेखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.

ते पुढे म्हणाले की, “टी२० विश्वचषकाला (T20 World Cup) निश्चितपणे प्राधान्य दिले पाहिजे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाला आपल्या खेळाडूंना आयपीएल (IPL) खेळण्यापासून रोखले पाहिजे.”

असे असले तरीही, ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिंस (Pat Cummins) आयपीएलमधील फ्रंचायझी संघांनी सर्वाधिक १५.५० कोटी रुपयांना विकत घेतलेला परदेशी खेळाडू आहे. तसेच ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) आणि डेव्हिड वॉर्नरनेदेखील (David Warner) आपल्या फ्रंचायझींबरोबर आकर्षक करार केले आहेत.

बॉर्डर यांना माहित आहे की, जागतिक क्रिकेटमध्ये भारताचा खूप दबदबा आहे. कारण आयसीसीच्या (ICC) उत्पन्नात त्यांचे सर्वाधिक योगदान आहे. परंतु त्यांनी म्हटले की, “जर आयपीएलला टी२० विश्वचषकाऐवजी प्राधान्य दिले तर ते चूकीच्या वाटेने जात आहेत.”

“यामुळे सर्व दरवाजे बंद होतील. तुम्हाला माहित आहे की, भारत आयपीएलचे आयोजन करत आहे. ते याच्या खूप जवळ आहेत. परंतु जर तुम्ही जागतिक क्रिकेट उत्पन्नाच्या ८० टक्के भाग असाल तर जे काही होईल त्यामध्ये तुमचेच ऐकले जाईल, हे मला माहिती आहे,” असेही ते यावेळी म्हणाले.

“मला वाटते की, जागितक क्रिकेट याला परवानगी देणार नाही. मला वाटत नाही की, आंतरराष्ट्रीय खेळाच्या बाबतीत भारताला अव्वल स्थानावर ठेवले जाईल. हे चूकीच्या मार्गाने जाण्यासारखे होईल,” असेही भारताबद्दल बोलताना बॉर्डर यावेळी म्हणाले.

ट्रेंडिंग घडामोडी-

-अखेर मोठ्या संकटात ‘त्या’ असलेल्या मित्राच्या मदतीला धावुन आले रहाणे- जाफर

-कसोटीत वेगवान त्रिशतक करणारे ५ क्रिकेटपटू

-ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूने आयपीएलमध्ये न खेळण्याचा दिला सल्ला

You might also like