मे महिन्याच्या सुरुवातीला आयपीएल २०२१मध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने हंगाम अर्ध्यातूनच स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) नुकतेच उर्वरित आयपीएल २०२१चे दुसरे सत्र १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये सुरू होणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे सर्व क्रिकेटप्रेमींसाठी ही आनंदाची बातमी आहे. दरम्यान, बीसीसीआयने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल सुरक्षिततेच्या संदर्भात काही नियम लागू केले आहे.
यात आयपीएलमध्ये सहभागी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंना विलिगिकरणात राहावे लागणार नाही. परंतु फ्रॅंचाईजीच्या सदस्यांना आणि त्यांच्या परिवारांना बायो-बबलचे कठोर पालन करावे लागणार आहे. जर याचे उल्लंघन झाले तर त्यांच्यावर अनुशासनात्मक कारवाई होण्याची शक्यता आहे.
आयपीएलच्या संचालन संस्थेने कोरोना प्रोटोकॉलबाबत म्हटले आहे की, “आयपीएलच्या सुरक्षिततेचा विचार करता फ्रॅंचाईजीच्या कोणत्याही सदस्याने किंवा खेळाडूंच्या परिवारातील सदस्याने कोणत्याही प्रकारे प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्यास, त्यांच्यावर अनुशासनात्मक कारवाई केली जाऊ शकते.”
आयपीएलमध्ये ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि बांगलादेश या देशातील खेळाडू खेळण्यासाठी येणार आहेत.
आयपीएलच्या प्रोटोकॉलनुसार सगळ्या फ्रॅंचाईजी संघातील सदस्यांना कोविड- १९ आरटी-पीसीआर चाचणी करणे बंधनकारक राहील. यूएईला रवाना होण्यापूर्वी ७२ तास आधी म्हणजे ३ दिवसांपूर्वी ही चाचणी करणे गरजेचे आहे.
त्याचबरोबर एएनआयनुसार, बीसीसीआयने सगळ्या फ्रॅंचाईजीना यूएईमध्ये दाखल होण्यापूर्वी सर्व सहभागी खेळाडू आणि संघातील सदस्यांना कोरोनाचे दोनही लस घेणे बंधनकारक करण्यास सांगितले आहे. अशा पद्धतीचे निर्देश दिले बीसीसीआयने दिले आहेत.
१९ सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या आयपीएलच्या उर्वरित दुसऱ्या सत्रातील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात आहे. आयपीएलचा हंगाम संपल्यानंतर लगेचच यूएईमध्येच २०२१ ची टी-२० विश्वचषक स्पर्धा देखील होणार आहे. त्यामुळे विश्वचषक स्पर्धेच्या अनुषंगाने सर्व खेळाडू आयपीएलमध्ये खेळताना दिसू शकतात.
महत्वाच्या बातम्या –
–अखेर खाते उघडले! सलग चौथ्या पराभवातून थोडक्यात वाचला ऑस्ट्रेलिया, ‘हा’ खेळाडू ठरला विघ्नहर्ता
–जसप्रीत बुमराहची फलंदाजी विराट कोहलीसाठी ठरली डोकेदुखी; भारतीय कर्णधार होतोय ट्रोल
–…म्हणून इंग्लंडविरुद्ध पहिल्या डावात चांगली कामगिरी करु शकलो, केएल राहुलचा खुलासा