कोणत्याही खेळात चांगली कामगिरी करण्यासाठी खेळाडूची फिटनेस अत्यंत महत्वाची असते. फिटनेस चांगली असली की तो कोणत्याही क्षणी त्याच्या कामगिरीने सामन्याची स्थिती बदलू शकतो. क्रिकेट या खेळाबद्दल बोलायचं झाल तर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचे नाव सर्वात तंदरुस्त खेळाडूंच्या यादीत घेतले जाते. मात्र काल आयपीएलमध्ये किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध झालेल्या सामन्यात त्याच्याकडून मोठ्या चुका झाल्या.
विराटने महत्वाच्या क्षणी पंजाबचा कर्णधार केएल राहुलचे दोन झेल सोडले. त्याने डेल स्टेन आणि नवदीप सैनी या दोन गोलंदाजांच्या चेंडूवर राहुलचे झेल सोडले. 82 धावांवर खेळत असताना विराटने राहुलचा पहिला झेल सोडला, त्यानंतर त्याने पुन्हा 7 धावा केल्या तेव्हा राहुल 89 धावांवर असताना विराटने त्याचा पुन्हा एक झेल सोडला. विराटकडून सुटलेल्या या झेलांमुळे तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल झाला आहे.
त्याच्या या चुकांमुळे केएल राहुलने आयपीएल 2020 चे पहिले शतक झळकावले आणि त्याने आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून सर्वात मोठी खेळी साकारली. दुसरा झेल सोडल्यानंतर पुढच्या 10 चेंडूंत केएल राहुलने 44 धावा केल्या. म्हणजे दुसरा झेल सोडल्यानंतर केएल राहुलचा स्ट्राइक रेट 440 होता. त्याने फक्त 62 चेंडूत शतक केले आणि 7 षटकार आणि 14 चौकारांच्या मदतीने त्याने एकूण नाबाद 132 धावा केल्या. त्याच्या या खेळीच्या जोरावर पंजाबने 20 षटकांत 206 धावा केल्या. तर त्यानंतर 207 धावांचा पाठलाग करताना बेंगलोरचा संघ 109 धावांवर सर्वबाद झाला.
Virat Kohli was the biggest supporter of KL Rahul's 132 runs. @klrahul11 pic.twitter.com/PoUdVWZJPS
— Dhamanpreet Kaur kang (@DhamanpreetKang) September 24, 2020
https://twitter.com/DhawanCricketr/status/1309175393715392514
Virat kohli when Virat when
Someone else he himself
Drops the catch drops the catch pic.twitter.com/ko2AjWi7J1— Naman Shrivastava (@ama_joking) September 24, 2020
https://twitter.com/WarangalCd/status/1309159613346975744
Need a friend like virat kohli
Who dropped a catch to help rahul to complete his century 😁 pic.twitter.com/DYMGZBwNGC— Kartik tikhe (@kartik_tikhe) September 24, 2020
https://twitter.com/sarcasticboyaai/status/1309162488181805057
https://twitter.com/Mr_Stark_/status/1309160634332766208
Virat Kohli vs KXIP | IPL 2020 | Better than Sachin Tendulkar??? pic.twitter.com/52V2y8wDDJ
— CNK (@jacknjohnnie) September 24, 2020
आश्चर्याची गोष्ट म्हणजे विराट कोहलीने आयपीएलच्या मागील 6 हंगामात 16 झेल सोडले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या क्षेत्ररक्षणाविषयी बोलयाच झालं तर गेल्या वर्षी या संघाने 24 झेल सोडले होते. यावर्षीही या संघाने 2 सामन्यांत 6 झेल सोडले आहेत.