fbpx
Thursday, April 22, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारत सोडून या ५ देशाचे सर्वाधिक खेळाडू झाले आहेत आयपीएलमध्ये मालामाल

August 31, 2020
in क्रिकेट, टॉप बातम्या
0

इंडियन प्रीमीयर लीगची क्रिकेटमधील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीगमध्ये गणना केली जाते. आयपीएलला सामन्यांच्या प्रसारणाचे हक्क, प्रायोजक, जाहिराती अशा अनेक गोष्टींमधून पैसे मिळत असतात. तसेच आयपीएलचे संघ खेळाडूंवर मोठ्या प्रमाणात खर्च देखील करत असतात.

आयपीएलमुळे अनेक गरीब घरातून आलेले खेळाडू चांगले कमाई करु लागले आहेत. अगदी खेड्यापाड्यातून शहरापर्यंत अनेक खेळाडूंना यात संधी मिळाली आहे. प्रत्येक संघ हा सर्व खेळाडूंवर कोट्यावधी रुपयांची खर्च करत असतात. आयपीएलमध्ये केवळ भारताचेच नाही तर भारताशिवाय अन्य १४ देशांचे खेळडू करारबद्ध झाले आहेत.

आयपीएल ही भारतीय लीग असल्याने अर्थातच भारताचे सर्वाधिक खेळाडू आयपीएलमध्ये खेळले आहेत. त्यामुळे आयपीएलमध्ये भारतीय खेळाडूंना सर्वाधिक मानधन मिळते. ४२६ भारतीय खेळाडू या स्पर्धेत आजपर्यंत करारबद्ध झाले आहेत. या खेळाडूंना मिळून आजपर्यंत २३५४ कोटी रुपये मानधन मिळाले आहे. आयपीएलमधून सर्व खेळाडूंना मिळालेल्या पैशांच्या ५४.९५ टक्के हिस्सा एकट्या भारतीय खेळाडूंना मिळाला आहे.

भारतापाठोपाठ ऑस्ट्रेलियाचे सर्वाधिक खेळाडू आयपीएलमध्ये खेळतात. ऑस्ट्रेलियाचे ८४ खेळाडू या स्पर्धेत खेळले असून त्यांना आजपर्यंत ६५३.८१ कोटी रुपये अर्थात एकूण मानधनाच्या १५.२६ टक्के रक्कम मिळाली आहे.

तसेच दक्षिण आफ्रिकेचे ५२ खेळाडू आत्तापर्यंत आयपीएलमध्ये करारबद्ध झाले आहेत. त्यांना ४२८.६३ कोटी रुपये अर्थात एकूण मानधनाच्या १०.१ टक्के रक्कम मिळाली आहे. तर आयपीएलमध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या देशांच्या खेळाडूंमध्ये वेस्ट इंडिज चौथ्या आणि श्रीलंका पाचव्या क्रमांकावर आहे.

वेस्ट इंडिजचे २९ खेळाडू आयपीएलमध्ये करारबद्ध झाले आहेत. तर श्रीलंकेचे २६ खेळाडू करारबद्ध झाले आहेत. वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना २७९.८९ कोटी रुपये मानधन मिळाले आहे. ही आयपीएलमधून सर्व खेळाडूंना मिळालेल्या मानधानाच्या ६.५३ टक्के रक्कम आहे. तर श्रीलंकेच्या खेळाडूंना १९१.४३ कोटी रुपये मानधन मिळाले असून एकूण मानधनाच्या ४.४७ टक्के रक्कम मिळाली आहे.

तसेच आयपीएलमध्ये पाकिस्तानचे खेळाडू केवळ १ मोसम खेळले आहेत. त्यांना २००८ नंतर आयपीएलमध्ये सामील करण्यात आलेले नाही. तरी पाकिस्तानचे एकूण ११ खेळाडू पहिल्या मोसमात खेळले. त्यांना त्यावेळी त्यांना एकूण १२८,४८८,००० मानधन मिळाले होते.

आयपीएलमध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंचे देश – 

१. भारत – ४२६ खेळाडू , कमाई – २३,५४१,५६६,९८१ रुपये (एकूण मानधनाच्या ५४.९५टक्के)

२. ऑस्ट्रेलिया  – ८४ खेळाडू , कमाई – ६,५३८,१३०,८४३ रुपये (एकूण मानधनाच्या १५.२६टक्के)

३. दक्षिण आफ्रिका – ५२ खेळाडू , कमाई – ४,२८६,३७३,१७२ रुपये (एकूण मानधनाच्या १०.०१ टक्के)

४. वेस्ट इंडिज – २९ खेळाडू , कमाई – २,७९८,९८२,५५० रुपये (एकूण मानधनाच्या ६.५३ टक्के)

५. श्रीलंका – २६ खेळाडू, कमाई – १,९१४,३०३,२५० रुपये (एकूण मानधनाच्या ४.४७ टक्के)

६. न्यूझीलंड – २६ खेळाडू , कमाई – १,५७७,१२९,५५० रुपये (एकूण मानधनाच्या ३.६८ टक्के)

७. इंग्लंड – २२ खेळाडू, कमाई – १,५१३,६२०,९०० रुपये (एकूण मानधनाच्या ३.५३ टक्के)

८. बांगलादेश – ६ खेळाडू , कमाई – २८५,८९५,५०० रुपये (एकूण मानधनाच्या ०.६७ टक्के)

९. अफगाणिस्तान – ४ खेळाडू , कमाई – १८९,०००,००० रुपये (एकूण मानधनाच्या ०.४४ टक्के)

१० पाकिस्तान – ११ खेळाडू , कमाई – १२८,४८८,००० रुपये (एकूण मानधनाच्या ०.३० टक्के)

११. नेदरलँड्स – २ खेळाडू , कमाई – ५२,७७०,३०० रुपये (एकूण मानधनाच्या ०.१२ टक्के)

१२. झिम्बाब्वे – ३ खेळाडू , कमाई – १०,३२०,००० रुपये (एकूण मानधनाच्या ०.२ टक्के)

१३. केनिया – १ खेळाडू , कमाई – २,०००,००० रुपये (एकूण मानधनाच्या ०.००५ टक्के)

१४. नेपाळ – १ खेळाडू , कमाई – २,०००,००० रुपये (एकूण मानधनाच्या ०.००५ टक्के)

१५. यूएई – १ खेळाडू, कमाई – १,०००,०००, (एकूण मानधनाच्या ०.००२ टक्के)

ट्रेडिंग लेख – 

सचिन नाही तर हे आहेत लाॅर्ड्सवर शतक करणारे ५ मराठमोळे मुंबईकर क्रिकेटपटू

सचिनच्या नावावर जरी धावा असल्या तरी हटके विक्रम आहेत कूकच्याच नावावर

१९८३ व २०११ क्रिकेटविश्वचषकाच्या बक्षीसाच्या रकमा आहेत विचार करायला लावणाऱ्या


Previous Post

आयपीएलमध्ये सर्वच संघांकडून पहिली विकेट घेणारे ८ गोलंदाज

Next Post

माझी कसोटी कारकीर्द बळकट करायची आहे, आयपीएलमध्ये संधी मिळाल्यास ती बोनस ठरेल, पहा कोण म्हणतंय

Related Posts

Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

‘चेन्नईकडून खेळताना कधी पाहू शकतो?’ चाहत्याच्या प्रश्नाला ताहिरने मन जिंकणारे उत्तर

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

प्रज्ञान ओझाचा मोठा खुलासा ‘धोनी सामन्यापूर्वी संघातील सदस्यांना देत नाही शुभेच्छा, कारण…”

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

चेन्नईला घाम फोडणारी धुवांधार खेळी केल्यानंतर कमिन्सच्या नावे जमा झाला आयपीएल विक्रम

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

माहीने रचला इतिहास! धोनीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/ICC
क्रिकेट

भारतात होणाऱ्या टी२० विश्वचषकातून दक्षिण आफ्रिका संघ होऊ शकतो बाहेर, ‘हे’ आहे कारण

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

KKR vs CSK : आंद्रे रसल, पॅट कमिन्सच्या वादळी अर्धशतकानंतरही कोलकाताचा चेन्नईकडून १८ धावांनी पराभव

April 21, 2021
Next Post

माझी कसोटी कारकीर्द बळकट करायची आहे, आयपीएलमध्ये संधी मिळाल्यास ती बोनस ठरेल, पहा कोण म्हणतंय

१९८० सालीच प्रणवदां मिळाली होती बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची ऑफर

...आणि तेव्हा ७७ वर्षांचे प्रणव दा क्रिकेट खेळण्यात रमले

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.