आयपीएल २०२० ही स्पर्धा येत्या १९ सप्टेंबर रोजी यूएईच्या मैदानावर खेळली जाईल. सर्व फ्रँचायझी संघ आयपीएल २०२० ची तयारी करत आहेत. प्रत्येक खेळाडूची या आयपीएल स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करण्याची इच्छा आहे.
आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाला विजेतेपद जिंकण्याची संधी मिळाली नाही. पण या संघात यावेळी सर्वोत्कृष्ट खेळाडूंचा समावेश आहे. संघातील या दमदार खेळाडूंच्या कामगिरीच्या जोरावर संघ विरोधी संघाला मोठे आव्हान देऊ शकतो. या संघात असणाऱ्या खेळाडूंकडे सामना एकहाती फिरविण्याची क्षमता आहे. या लेखात दिल्ली कॅपिटलच्या अशा तीन खेळाडूंबद्दल चर्चा करूया, जे आयपीएलमध्ये त्यांच्या संघाला विजय मिळवून देऊ शकतात. या संघाचा पहिला सामना २० सप्टेंबर २०२० रोजी किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध दुबईमध्ये होणार आहे.
श्रेयस अय्यर (Shreyas Iyer)
दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर हा एक प्रतिभावान फलंदाज आहे. यंदा तो कर्णधार फलंदाज म्हणून स्वतःला सिद्ध करण्यास उत्सुक आहे. त्याच्याकडे एकहाती सामना जिकंण्याची ताकद आहे.
मागील ४ हंगामापासून तो आयपीएलमध्ये खेळात आहे. मागील हंगामात १६ सामन्यात ४६३ धावा केल्या तर आतापर्यंतच्या आयपीएल कारकिर्दीत ६२ सामन्यात १६८१ धावा केल्यात, त्यात १३ अर्धशतकांचा समावेश आहे.
दिल्ली संघाने एकदाही आयपीएल चषक जिंकलेला नाही. यंदा श्रेयस त्याच्या फलंदाजीतून उत्तम कामगिरी करून संघाला यंदाचे आयपीएल चशल जिंकून देऊ शकतो.
आर अश्विन (R. Ashwin)
आयपीएल २००८ मध्ये चेन्नई सुपर किंग्जने अश्विनला विकत घेतले. २००८ मध्ये अश्विनला सीएसकेमधून खेळण्यास जास्त संधी मिळाली नव्हती. पण २००९ आणि २०१० मध्ये त्याला संधी मिळाली आणि तो सर्वांसमोर आला. मागील २ हंगाम तो पंजाब संघाकडूनही खेळाला. तो उत्कृष्ठ ऑफ स्पिन आणि कॅरम चेंडू टाकतो तसेच मधे-मधे तो गुगली चेंडू फेकून फलंदाला अडचणीत आणतो.
यंदा अश्विन दिल्ली कॅपिटल्स संघाचा सदस्य आहे. आयपीएलमध्ये त्याने आतापर्यंत १३९ सामने खेळले असून त्यात १२५ बळी मिळवले आहेत. यात त्याची सर्वोत्कृष्ठ कामगिरी ४/३४ अशी आहे.
यंदा तो त्याच्या जादुई गोलंदाजीने दिल्ली संघाला प्रथमच आयपीएल विजेता बनवू शकतो.
रिषभ पंत (Rishabh Pant)
रिषभ पंत हा दिल्ली कॅपिटल संघातील सर्वात घातक खेळाडू आहे. रिषभ पंतने अनेक वेळा दिल्लीसाठी उपयुक्त अशी फलंदाजी केली आहे. सामना एकहाती फिरवण्याची क्षमता एकट्या रीषभ पंतमध्ये आहे.
त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत ५४ सामन्यात १७३६ धावा केल्या आहेत. त्यांची सर्वोच्च धावसंख्या नाबाद १२८ धावा आहे. यावरूनच दिसते की त्याची भूमिका यंदा दिल्ली कॅपिटल संघासाठी नक्कीच महत्वाची ठरणार आहे.
आयपीएल २०२० मधील कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या सामन्यांचे वेळापत्रक-
२० सप्टेंबर २०२०
विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब
२५ सप्टेंबर २०२०
विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
२९ सप्टेंबर २०२०
विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
३ ऑक्टोबर २०२०
विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
५ ऑक्टोबर २०२०
विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
६ ऑक्टोबर २०२०
विरुद्ध राजस्थान रॉयल्स
११ ऑक्टोबर २०२०
विरुद्ध मुंबई इंडियन्स
१४ ऑक्टोबर २०२०
विरुद्ध राजस्थान रॉयल्स
१७ ऑक्टोबर २०२०
विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
२० ऑक्टोबर २०२०
विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब
२४ ऑक्टोबर २०२०
विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
२७ ऑक्टोबर २०२० सनरायझर्स हैदराबाद
३१ ऑक्टोबर २०२०
विरुद्ध मुंबई इंडियन्स
२ नोव्हेंबर २०२०
विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
दिल्ली कॅपिटल्स संघ-
श्रेयस अय्यर (कर्णधार), कगिसो रबाडा, मार्कस स्टोईनिस, संदीप लामिछाने, इशांत शर्मा, अजिंक्य रहाणे, आर अश्विन, शिखर धवन, शिमरॉन हेटमायर, डॅनियल सॅम्स, अॅलेक्स कॅरी, मोहित शर्मा, पृथ्वी शॉ, ललित यादव, आवेश खान, अक्षर पटेल , तुषार देशपांडे, एनरिच नॉर्टज, ऋषभ पंत, हर्षल पटेल, केमो पॉल, अमित मिश्रा.