शनिवारी (१७ ऑक्टोबर) दुबईमध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात सामना पार पडला. या सामन्यात बेंगलोरने राजस्थानला ७ विकेट्सने पराभूत केले. बेंगलोरच्या विजयात एबी डिविलियर्सने २२ चेंडूत ५५ धावांची खेळी करत महत्त्वाचा वाटा उचलला. मात्र या सामन्यादरम्यान बेंगलोरचा सलामीवीर ऍरॉन फिंच बराच चर्चेत आला. त्याला कारणही तसेच होते. तो या सामन्यादरम्यान धुम्रपान करताना दिसला. त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
झाले असे की १७८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असलेल्या बेंगलोरला विजयासाठी शेवटच्या ५ चेंडूत ८ धावांची गरज होती. त्याचवेळी कॅमेरा बेंगलोरच्या ड्रेसिंगरुमकडे वळाला. यावेळी फिंच ई-सिगारेट ओढताना दिसला. कॅमेरा अगदी काही सेंकदासाठीच बेंगलोरच्या ड्रेसिंगरुमकडे वळाला होता. पंरतु या काही सेंकदातही फिंचची ही कृती कॅमेरात कैद झाली.
यामुळे सध्या फिंचवर टिका होत असून आता यावर आयपीएल गव्हर्निंग कौन्सिल काय निर्णय घेणार, हे पाहावे लागेल.
Aron Finch vaping in dressing room. #Dream11IPL2020 #Dream11Team #rcb #RCBvsRR #bcci #iplindubai @BCCI Is this allowed during match? Also is it only Finch or others also enjoyed vaping in dressing room? Nation wants to know! pic.twitter.com/FsEed8OBue
— AJ (@ajayshankarkhar) October 17, 2020
Finch vaping in the dressing room???? #Dream11IPL #IPL2020 #RRvsRCB pic.twitter.com/sx5rqsCTHd
— Kevin ???????? (@_Kevin__Shah) October 17, 2020
Did we just see @AaronFinch5 with a vape in the dressing room wtf????@RCBTweets #AaronFinch #Vape #IPL2020 #RCBvsRR pic.twitter.com/loftYvJkVy
— दिव्येश (@divyesh_here) October 17, 2020
Aaron finch caught smoking during live match???? pic.twitter.com/u4aDtYO4sk
— Mohit Parashar (@im619_) October 17, 2020
Sir Aaron Finch vaping in the dressing room ????????️ ????#Dream11IPL #IPL2020 #RRvsRCB @IPL @RCBTweets pic.twitter.com/6UHtPZLVmN
— Saifur Rahman ???? (@Saifur_R_BD) October 18, 2020
आयपीएलमध्ये क्रिकेटपटूने सामन्यादरम्यान सिगारेट ओढण्याची ही पहिली घटना नाही. २००८ मध्ये आयपीएलच्या एका सामन्यादरम्यान शेन वॉर्न मैदानात सिगारेट ओढत असताना दिसला होता. ज्यावरुन बराच वाद झाला होता. त्यावेळी वॉर्न राजस्थान संघाचा भाग होता. तसेच एकदा एका आयपीएल सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा संघमालक शाहरुख खान देखील सिगारेट ओढताना दिसला होता.
शनिवारी झालेल्या सामन्यात डिविलियर्सने षटकार खेचत बेंगलोरला विजय मिळवून दिला. हा बेंगलोरचा ६ वा विजय होता. ते सध्या गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
…म्हणून ब्राव्होऐवजी जडेजाने केली शेवटच्या षटकात गोलंदाजी, धोनीने सांगितले कारण
सुपरमॅनने करून दाखवलं! राजस्थानच्या हातून विजय खेचून आणणाऱ्या डिविलिअर्सचे ट्विटरवर जोरदार कौतुक
“धवनच्या विकेटसाठी चेन्नईचे हवन”, दिल्लीविरुद्धच्या खराब कामगिरीमुळे ट्विटरवर उडतेय खिल्ली
ट्रेंडिंग लेख –
आयपीएल २०२०: असे ३ खेळाडू, ज्यांनी एक खेळी संघासाठी नाही तर स्वतःसाठी खेळली
-यंदा दिल्ली कॅपिटल्स का करत आहे जबरदस्त कामगिरी? जाणून घ्या यशाची ३ कारणे