27 जूनपासून सुरू होणाऱ्या आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ शनिवार दि. 23 जूनला रवाना होणार असल्याची माहिती बीसीसीआयने प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे.
भारतीय संघ अनुक्रमे 27 आणि 29 जूनला आयर्लंड विरुद्ध डब्लिन येथे दोन टी-20 सामने खेळणार आहे.
त्यानंतर भारतीय संघ आयर्लंडहून थेट इंग्लंडला तीन महिन्यांच्या दीर्घ दौऱ्यावर जाणार आहे.
इंग्लंडमध्ये भारतीय संघ 3 जुलैपासून तीन टी-20, तीन वनडे आणि पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.
या दौऱ्यातील मर्यादित षटकांच्या मालिकांसाठी भारतीय संघाची आधीच निवड करण्यात आली आहे. मर्यादित षटकांच्या मालिकांसाठी भारतीय संघात वॉशिंगटन सुंदर, सिद्धार्थ कौल या युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.
तसेच जवळजवळ तीन वर्षांनंतर सुरेश रैनाने भारताच्या वनडे संघात पुनरागमन केले आहे. अंबाती रायडू फिटनेस टेस्टमध्ये अयशस्वी झाल्याने रैनाला त्याच्या ऐवजी संधी देण्यात आली आहे.
भारतीय संघ या दौऱ्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे.
असा आहे भारताचा टी 20 संघ:
विराट कोहली(कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, केएल राहुल, सुरेश रैना, मनीष पांडे, एमएस धोनी, हर्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, वाशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बूमराह, सिद्धार्थ कौल, उमेश यादव
असा आहे भारताचा वनडे संघ:
विराट कोहली(कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, केएल राहुल, श्रेयस अय्यर, एमएस धोनी, दिनेश कार्तिक, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बूमराह, हर्दिक पंड्या, सिद्धार्थ कौल, भुवनेश्वर कुमार, सुरेश रैना, उमेश यादव
असा असेल भारताचा आयर्लंड इंग्लंड दौरा
आयर्लंड दौरा-
27 जून- पहिला टी-20 सामना
29 जून दुसरा टी-20 सामना
इंग्लंड दौरा-
टी-20 मालिका:
3 जुलै- पहिला टी-20 सामना
6 जुलै- दुसरा टी-20 सामना
8 जुलै- तीसरा टी-20 सामना
एकदिवसीय मालिका:
12 जुलै- पहिला एकदिवसीय सामना
14 जुलै- दुसरा एकदिवसीय सामना
17 जुलै- तीसरा एकदिवसीय सामना
कसोटी मालिका:
1 ऑगस्ट- पहिला कसोटी सामना
9 ऑगस्ट- दुसरा कसोटी सामना
18 ऑगस्ट- तीसरा कसोटी सामना
30 ऑगस्ट- चौथा कसोटी सामना
7 सप्टेंबर- पाचवा कसोटी सामना
महत्त्वाच्या बातम्या:
–Video: रशीद खानच्या भावाची गोलंदाजी पाहिली का?
–धोनीबाबत आणखी एका यष्टीरक्षकाचे मोठे वक्तव्य
–भारताविरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी असा आहे आयरलँडचा संघ