आयर्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील सर्वच्या सर्व सामने न्यूझीलंडने जिंकले. शुक्रवारी (१५ जुलै) आयर्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात एक रोमांचक सामना पाहायला मिळाला. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना मोठी धावसंख्या उभी केली होती. प्रत्युत्तारत आयर्लंडच्या फलंदाजांनी शेवटच्या चेंडूपर्यंत झुंज दिली, परंतु शेवटी त्यांना अपयश आले.
सलामीवीर मार्टिन गप्टील (११५) आणि हेनरी निकोल्स (७९) यांच्या धमाकेदार प्रदर्शनाच्या जोरावर न्यूझीलंडने ५० षटकांमध्ये ६ विकेट्सच्या नुकसानावर ३६० धावा केल्या. प्रत्युत्तारत आयर्लंडचा सलामीवीर पॉल स्टर्लिंग (१२०) आणि हॅरी टेक्टर (१०८) यांनी अप्रतिम प्रदर्शन केले. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी १७९ धावांची भागीदारी पार पाडली. पण संघाला विजय मात्र मिळवून देऊ शकले नाहीत. न्यूझीलंडने दिलेल्या ३६१ धावांचा पाठलाग करताना आयर्लंड संघ ३५९ धावांपर्यंत मजल मारू शकला. शेवटच्या चेंडूवर त्यांना २ धावांची आवश्यकता होती, पण त्या मिळाल्या नाहीत.
What a partnership this is.
SCORE: https://t.co/iHiY0Un8Zh#BackingGreen | #Exchange22 | #ABDIndiaSterlingReserve ☘️???? pic.twitter.com/1LYrFOGPwv
— Cricket Ireland (@cricketireland) July 15, 2022
हॅरी टेक्टर जोपर्यंत खेळपट्टीवर होता, तोपर्यंत आयर्लंड संघाचे पारडे जड वाटत होते. पण डावाच्या ४४ व्या षटकात मिचेल सॅटनरने त्याला त्रिफळाचीत केले. त्यावेळी संघाची धावसंख्या ३१० धावा होती. त्यानंतर जॉर्ज डॉकरेलने संगाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला, पण तो १७ चेंडूत २२ धावा करून बाद झाला. डवाच्या शेवटच्या षटकात आयर्लंडला विजयासठी १० धावांची आवश्यकता होती, पण दोन धावा कमी पडल्यामुळे त्यांना पराभव स्वीकारावा लागला.
What a game of cricket at Malahide with @cricketireland! Blair Tickner defends 10 runs from the 50th over to clinch a 3-0 series win against Ireland. Scorecard | https://t.co/y9efspGmBS #IREvNZ #IREvNZ pic.twitter.com/gd3cYMAxm5
— BLACKCAPS (@BLACKCAPS) July 15, 2022
शेवटच्या षटकात खेळपट्टीवर क्रेग यंक आणि ग्राहम ह्यूम होते. पहिल्या चेंडूवर ह्यूम एकही धाव घेऊ शकला नाही. पुढच्या चेंडूवर त्याने एक धाव घेतली आणि क्रेग यंक स्ट्राईकवर आला. षटकातील तिसऱ्या चेंडूवर यंगने चौकार मारला. चौकारानंतर चाहत्यांना आशा वाढल्या होत्या. मात्र, पुढच्याच चेंडूवर यंग धावबाद झाला. दोन धावा घेण्याच्या प्रयत्नात असताना मार्टिन गप्टिलने चेंडू पकडला आणि वेगात यष्टीरक्षक टॉम लाथमच्या हातात फेकला. परिणामी यंकला खेळपट्टी सोडावी लागली.
शेवटच्या दोन चेंडूत ४ धावांची गरज होती. पाचव्या चेंडूवर एक धाव घेतली आणि शेवटच्या चेंडूवर बायमुळे एक धाव मिळाली. न्यूझीलंडने २ धावांनी हा सामना जिंकला असून, मालिका ०-३ अशा अंतराने जिंकली. मार्टिन गप्टिल (Martin Guptil) त्याच्या शतकीय खेळीसाठी सामनावीर ठरला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘भारतात अजून असा कोणी जन्माला नाही जो, विराटला…’ पाकिस्तानच्या माजी कर्णधाराचे खळळबळजनक विधान
धोनीचा पठ्ठ्या टी२०त गाजतोय! केवळ १९ चेंडूत १०० धावा करत गाजवलंय मैदान
आता ठरलंय! ‘हे’ १२ संघ खेळणार आयसीसी टी२० विश्वचषक, वाचा कधी आणि कुणाशी भिडणार भारत