काल (४ ऑगस्ट) इंग्लंड विरुद्ध आयर्लंड संघातील तिसरा आणि शेवटचा वनडे सामना पार पडला. या सामन्यातील दोन्ही डावांमध्ये दमदार शतकीय प्रदर्शन पाहायला मिळाले. पहिल्या डावात इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनने ८४ चेंडूत दमदार फटकेबाजी करत १०६ धावांची शतकी खेळी केली. तर, दूसऱ्या डावात आयर्लंडचा सलामीवीर फलंदाज पॉल स्टर्लिंग (१४२ धावा) आणि कर्णधार अँड्र्यू बालबिर्नी (११३ धावा) यांनीही दमदार शतकी खेळी केल्या. Ireland Cricketer Paul Stirling Smashed Century Against England In Third ODI
साउम्पटन येथे पार पडलेला तिसऱ्या वनडे सामन्यात आयर्लंडने इंग्लंडचे ३२९ धावांचे आव्हान पूर्ण करत ऐतिहासिक विजय मिळवला. हा सामना आयर्लंडने ७ विकेट्सने जिंकला. असे असले तरी, इंग्लंडने ३ सामन्यांची वनडे मालिका २-१च्या फरकाने जिंकली.
या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडला ३२९ धावांचे आव्हान दिले होते. सुरुवातीला आयर्लंड संघातील फलंदाजांना एवढा विशाल स्कोर करणे कठीण जाईल, असे वाटत होते. परंतु, सलामीला फलंदाजी करण्यासाठी आलेल्या स्टर्लिंगने शतकी खेळी करत पूर्ण डाव पालटला. त्याने केवळ ९६ चेंडूत ५ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने त्याचे शतक पूर्ण केले. हे स्टर्लिंगचे वनडेतील ९वे शतक होते. तर, इंग्लंडविरुद्ध हे त्याच्या वनडे कारकिर्दीतील पहिले शतक होते.
तर, स्टर्लिंग पाठोपाठ कर्णधार बालबिर्नीनेही १०० चेंडूत १२ चौकारांच्या मदतीने शतकाला गवसणी घातली. त्यामुळे इंग्लंडविरुद्ध इंग्लंडमध्ये वनडेत शतक ठोकणारा स्टर्लिंग हा पहिला तर बालबिर्नी हा दूसरा आयर्लंडचा फलंदाज ठरला.
तसेच, इंग्लंडविरुद्ध वनडेत तब्बल ९ वर्षांनी कोणत्या आयर्लंड फलंदाजाने शतक ठोकले आहे. स्टर्लिंग आणि बालबिर्नीपुर्वी २०११ सालच्या विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध आयर्लंडचा फलंदाज केविन ओ ब्रायनने शतक ठोकण्याचा कारनामा केला होता. त्याने बेंगलुरु येथे इंग्लंडविरुद्ध झालेल्या वनडे सामन्यात केवळ ६३ चेंडूत ११३ धावा केल्या होत्या. यात त्याच्या १३ चौकरांचा आणि ६ षटकारांचा समावेश होता.
महत्त्वाच्या बातम्या –
आजपासून इंग्लंड पाकिस्तान कसोटी मालिकेला सुरुवात, जाणून घ्या सर्वकाही
डोंगराएवढे लक्ष आयर्लंडने पार करत इंग्लंडला चारली पराभवाची धुळ, २०११ विश्वचषकाची झाली आठवण
कोरोनाबाधीताबरोबर घालवला वेळ, दोन मोठे क्रिकेटर कॅरेबियन लीगमधून बाहेर
ट्रेंडिंग लेख –
५ असे क्रिकेटर, जे आयपीएल २०२० दरम्यान स्वत:ला फिनीशर म्हणून सिद्ध करायला उत्सुक
धोनीच्या लाडक्या खेळाडूसह या ५ क्रिकेटर्सचं नशीब आयपीएलमध्ये राहिलं खराब
आयपीएल २०२०- डेथ ओव्हर्समध्ये या ५ गोलंदाजांकडे असणार जगाचे लक्ष