भारतीय संघाचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू इरफान पठान हा सध्या सोशल मीडियावर जास्त सक्रिय आहे. त्याने नुकत्याच भारताचा डावखुरा फलंदाज सुरेश रैनासोबत झालेल्या लाइव्ह व्हिडिओमध्ये आपल्या कारकिर्दीविषयी चर्चा केली होती. तो म्हणाला की, २००३मध्ये त्याला पाकिस्तान दौऱ्यावर जायचे नव्हते तरीही त्याला बळजबरी जावे लागले. विशेष म्हणजे, या दौऱ्यावर इरफानने हॅट्रिक घेण्याचा कारनामा केला होता.
२००३ला १४ वर्षांत पहिल्यांदा १९ वर्षांखालील भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार होता. जेव्हा इरफानची पाकिस्तान दौऱ्यावर निवड झाली होती. तेव्हा तो १९ वर्षांचा होता आणि त्याला पाकिस्तानला जायचे नव्हते. Irfan Pathan didn’t want to go with u19 indian squad on pakistan tour.
याविषयी बोलताना इरफान म्हणाला की, “मला १९ वर्षांखालील भारतीय संघासोबत पाकिस्तान दौऱ्यावर जायचे नव्हते. रणजी ट्रॉफी चालू होती आणि माझ्या बडोदा संघाचा मुंबईविरुद्ध सामना होणार होता. मी शेट्टी सरांना सांगितले होते की, माझा मुंबईविरुद्ध सामना आहे आणि मी चांगल्या फॉर्ममध्ये आहे. मी जर मुंबईविरुद्ध चांगले प्रदर्शन केले तर मला त्याचा फायदा होईल.”
“यावर माझ्या प्रशिक्षकाने मला प्रेरित करत म्हटले होते की, भारत १४ वर्षांनंतर पहिल्यांदा भारत पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे. तू यापुर्वीही १९ वर्षांखालील क्रिकेट खेळले आहेस. खरे सांगायचे झाले तर मी तिथे खूप निराश होऊन गेलो होतो. पण कुणाला माहिती होते की तिथे गेल्यावर माझ्यासोबत काय होणार होते,” असे पुढे बोलताना इरफान म्हणाला.
इरफानने नोव्हेंबर २००३मध्ये लाहोर येथील १९ वर्षांखालील बांग्लादेश संघाविरुद्धच्या सामन्यात ९ विकेट्स घेतल्या होत्या. त्या सामन्यात इरफानने सलग ३ विकेट्स घेत हॅट्रिक घेतली होती. त्यानंतर डिसेंबरमधील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीतून इरफानला भारतीय संघात पदार्पण करण्याची संधी मिळाली होती.
इरफानने त्याच्या कसोटी कारकिर्दीत २९ कसोटी सामने खेळत ११०५ धावा केल्या होत्या. तर, १०० विकेट्स घेतल्या होत्या. वनडेत त्याने १२० सामन्यात १५४४ धावा केल्या होत्या आणि १७३ विकेट्स घेतल्या होत्या. तर, २४ टी२० सामन्यात इरफानने १७२ धावा केल्या होत्या आणि २८ विकेट्स घेतल्या होत्या.
ट्रेंडिंग घडामोडी-
फक्त महाराष्ट्रीय खेळाडूंना घेऊन केलेली टीम इंडियाची वनडे ड्रीम ११
विश्वविजेत्या कर्णधाराने बदलली रखवालदाराच्या मुलाची जिंदगी, आज मोदीही…
ज्या स्टेडियमवर धोनीच्या षटकाराने इंडियाला मिळवुन दिला विश्वचषक ते…