Loading...

हा दिग्गज क्रिकेटपटू म्हणतो, टीम इंडियामधील ‘हा’ खेळाडू सर्वात महत्त्वाचा

भारतीय क्रिकेट संघाच्या नुकत्याच पार पडलेल्या वेस्ट इंडीज दौऱ्यातील कसोटी मालिकेत भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने शानदार कामगिरी केली. त्याने 2 सामन्यांच्या या कसोटी मालिकेत 13 विकेट्स घेताना भारताने या मालिकेत मिळवलेल्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात त्याने हॅट्रिक घेण्याचीही कामगिरी केली.

बुमराहच्या या शानदार प्रदर्शनानंतर अनेकांनी त्याचे कौतुक केले आहे. यामध्ये भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू इरफान पठाणचाही समावेश झाला आहे. इरफानने बुमराहला संघातील सर्वात महत्त्वाचा क्रिकेटपटू असल्याचे म्हटले आहे. तसेच ही त्याची ही शेवटची हॅट्रिक नव्हती असेही म्हटले आहे.

इरफान आयएएनएसशी बोलताना म्हणाला, ‘माझा विश्वास आहे की बुमराह संघातील सर्वात महत्त्वाचा क्रिकेटपटू आहे.’

‘जेव्हा बुमराह भारतासाठी खेळत नाही तेव्हा बाकी कोणाही पेक्षा हे खूप मोठे नुकसान असते. तो संघाचा महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यासारखा खेळाडू मिळाल्याने भारतीय क्रिकेट संघ सुदैवी आहे.’

‘भारताला त्याची काळजी घेण्याची गरज आहे. तो असा गोलंदाज आहे जो तिन्ही क्रिकेटप्रकारात यशस्वी होऊ शकतो.’

Loading...

बुमराह हा कसोटीमध्ये हॅट्रिक घेणारा भारताचा तिसरा गोलंदाज ठरला होता. त्याच्याआधी 2001 मध्ये हरभजन सिंगने तर 2006 मध्ये इरफानने हा कारनामा केला होता.

बुमराहच्या हॅट्रिकबद्दल इरफान म्हणाला, ‘मला खात्री आहे की ही त्याची शेवटची हॅट्रिक नाही.’

Loading...

त्याचबरोबर हॅट्रिक घेतल्यानंतर काय भावना असतात याबद्दल सांगताना इरफान म्हणाला, ‘ही सर्वात मस्त भावना असते. तूम्हाला माहित असते हे नेहमी होत नाही. काही खेळाडूंना त्यांच्या कारकिर्दीत हॅट्रिक घेता येत नाही. जेव्हा तूम्ही ती घेता तेव्हा तूम्ही काहीतरी दुर्मिळ केलेले असते.’

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

२०२० आयपीएलमध्ये आर अश्विन खेळणार ‘या’ संघाकडून

दुसऱ्या कसोटीतील ‘सामनावीर’ हनुमा विहारीला रवी शास्त्रींनी दिला होता हा सल्ला

हा खेळाडू म्हणतो, स्टोक्समुळे माझी रात्रीची झोप उडाली

Loading...
You might also like
Loading...