इंडियन प्रीमीयर लीगचा यावर्षी १५ वा हंगाम (IPL 2022) खेळवला जाणार आहे. या हंगामापूर्वी १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी मेगा लिलाव (Mega Auction) झाला. बंगळुरू येथे झालेल्या या लिलावात अनेक स्टार खेळाडूंना कोट्यावधी रुपयांची बोली लागलेली पाहाला मिळाली. या लिलावात गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपरजायंट्स या दोन नव्या संघांनीही जुन्या ८ संघांसह सहभाग घेतला होता. दोन दिवस सलगपणे लिलाव पार पडल्यानंतर अनेक दिग्गज क्रिकेटपटू कोणता संघ मजबूत आहे याविषयी आपली प्रतिक्रिया देत आहेत. भारताचा माजी वेगवान गोलंदाज व क्रिकेट समीक्षक इरफान पठाण (Irfan Pathan) यानेदेखील त्याच्या दृष्टीने कोणते तीन संघ मजबूत आहेत हे सांगितले.
दोन दिवसीय लिलावावेळी इरफान पठाण व मोहम्मद कैफ हे माजी भारतीय खेळाडू समीक्षक म्हणून भूमिका बजावत होते. लिलाव संपल्यानंतर इरफान पठाण याने ट्विट करत तीन मजबूत संघांची नावे घेतली. त्याने आपले मत दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्स व लखनऊ सुपरजायंट्स या संघांच्या पारड्यात टाकले. या तिन्ही संघांमध्ये अनेक मॅचविनर खेळाडू सामील आहेत.
Delhi capitals. Lucknow supergiants. Punjab kings are my top 3 after the auction. Whats yours guys?? #IPLAuction
— Irfan Pathan (@IrfanPathan) February 13, 2022
असे आहेत तिन्ही संघ
लखनऊ सुपरजायंट्स – केएल राहुल (कर्णधार), मार्कस स्टॉयनिस, रवी बिश्नोई, क्विंटन डी कॉक, मनीष पांडे, जेसन होल्डर, दीपक हुडा, कृणाल पंड्या, मार्क वुड, आवेश खान, अंकित राजपूत, के गॉथम, दुष्मंता चमीरा, शाहबाज नदीम, मनन वोहरा, मोहसिन खान, आयुष बडोनी, काइल मेयर्स, करण शर्मा, एविन लुईस, मयंक यादव.
पंजाब किंग्स – मयंक अगरवाल, अर्शदीप सिंग, शिखर धवन, कागिसो रबाडा, जॉनी बेअरस्टो, राहुल चाहर, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, प्रभसिमरन सिंग, जितेश शर्मा, इशान पोरेल, लियाम लिव्हिंगस्टोन, ओडियन स्मिथ, संदीप शर्मा, राज बावा, ऋषी धवन, प्रेरक मंकड, वैभव अरोरा, वृत्तीक चॅटर्जी, बलतेज धांडा, अंश पटेल, नॅथन एलिस, अथर्व तायडे, भानुका राजपक्षे, बेनी हॉवेल.
दिल्ली कॅपिटल्स – रिषभ पंत (कर्णधार आणि यष्टीरक्षक), अक्षर पटेल, पृथ्वी शॉ, एन्रिच नॉर्किया, डेव्हिड वॉर्नर, मिशेल मार्श, शार्दुल ठाकूर, मुस्तफिजुर रहमान, कुलदीप यादव, अश्विन हेब्बर, सरफराज खान, कमलेश नागरकोटी, केएस भरत, मनदीप सिंग, खलील अहमद, चेतन साकारिया, ललित यादव, रिपल पटेल, यश धुल, रोवमन पॉवेल, प्रवीण दुबे, लुंगी एन्गिडी, टिम सिफर्ट, विकी ओस्तवाल.
महत्वाच्या बातम्या-
अनसोल्ड गेलेल्या अमित मिश्रासाठी दिल्ली कॅपिटल्सच्या संघमालकाची भावूक पोस्ट; लिहीले… (mahasports.in)