शनिवारी (१० ऑक्टोबर) अबु धाबी येथे कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब संघात आयपीएल २०२०चा २४वा सामना झाला. या सामन्यात कोलकाताने पंजाबला २ धावांनी पराभूत केले. कोलकाताचा कर्णधार दिनेश कार्तिकने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी निवडली आणि २० षटकात १६४ धावा केल्या. प्रत्युत्तरात पंजाब संघ २० षटकात १६२ धावाच करु शकला.
दरम्यान कोलकाताचा सलामीवीर फलंदाज शुबमन गिलने दमदार फलंदाजी प्रदर्शन केले. त्याने ४७ चेंडूत ५ चौकारांच्या मदतीने ५७ धावा केल्या. त्यामुळे सामन्यादरम्यान समालोचन करत असलेल्या माजी क्रिकेटपटू इरफान पठानने युवा फलंदाज गिलची तोंडभरुन प्रशंसा केली. गिलला कोलकाता संघाचे नेतृत्त्वपद देण्याची मागणी त्याने केली.
इरफान म्हणाला की, “कोलकाता संघ गिलला भविष्यातील कर्णधाराच्या रुपात पाहात आहे. एवढेच नाही तर, त्यांनी गिलकडून तशाप्रकारची तयारीदेखील करुन घ्यायला सुरुवात केली आहे.”
आयपीएलच्या तेराव्या हंगामात आतापर्यंत गिलने ६ सामने खेळले आहेत. त्यात त्याने ४४च्या सरासरीने आणि ११७.०२च्या स्ट्राईक रेटने २२० धावा केल्या आहेत. दरम्यान त्याने २ अर्धशतकेही लगावली आहेत. महत्त्वाचे म्हणजे, गिल या हंगामात माजी भारतीय अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगच्या बॅटने फलंदाजी करत आहे.
२६ सप्टेंबर रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध झालेल्या आयपीएल २०२०च्या ८व्या सामन्यामध्ये गिलने ६२ चेंडूत नाबाद ७० धावांची तूफानी खेळी केली होती. त्या अतुलनीय प्रदर्शनानंतर गिलने त्याच्या बॅटसोबत काढलेला फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यावर युवराजने कमेंट केली होती की, “खूप छान मिस्टर गिल… कोणाची बॅट आहे ही?.”
Glad to get off the mark. @KKRiders ???? pic.twitter.com/UuZ5KP72Ew
— Shubman Gill (@ShubmanGill) September 27, 2020
You tell me paji ????
— Shubman Gill (@ShubmanGill) September 28, 2020
युवराजच्या कमेंटला प्रत्युत्तर देत गिलने लिहिले की, “तुम्हीच सांगा पाजी.” अर्थातच ती बॅट युवराजची आहे, असे गिलला म्हणायचे होते.
महत्त्वाच्या बातम्या-
पंजाब संघामागची साडेसाती संपेना! ८.५ कोटींना टीममध्ये घेतलेल्या खेळाडूला झाली दुखापत
ज्या धोनीच्या सीएसकेला नडला, त्याच धोनीशी राहुल त्रिपाठीचे आहे खास नाते
कधीकाळी खेळपट्टी तयार करणारा गाजवतोय आयपीएल, वाचा त्याच्या संघर्षाची कहानी
ट्रेंडिंग लेख-
आयपीएलमध्ये ‘या’ ४ खेळाडूंना कोणत्याही क्षणी संघ देऊ शकतात नारळ
फलंदाजीत लईच भारी! ‘या’ ३ संघांचा आयपीएल २०२०मध्ये नादच खुळा
आयपीएल २०२० : ‘या’ तीन संघांचे प्ले-ऑफमध्ये पोहोचणे जवळपास निश्चित