कोणत्याही संघाच्या प्रदर्शनामागे संघातील खेळाडू, प्रशिक्षक यांच्याबरोबर संघ व्यवस्थापनाचाही (टीम मॅनेजमेंट) हात असतो. खेळाडूंच्या सर्व गरजांचे व्यवस्थापन, त्यांच्या तब्येतीची काळजी, प्रवासाच्या सुविधा अशा गोष्टींवर त्यांना देखरेख ठेवावी लागते. प्रतिष्ठित इंडियन प्रीमियर लीगच्या सर्व फ्रंचायझींचे संघ व्यवस्थापनही त्यांची जबाबदारी चोखपणे पार पाडत असतात. मात्र माजी भारतीय क्रिकेटपटू इरफान पठानच्या मते मुंबई इंडियन्सचे संघ व्यवस्थापन इतर संघांपेक्षा वेगळे आहे.
मुंबई इंडियन्सच्या संघ व्यवस्थापनाचे वेगळेपण
बुधवारी (२८ ऑक्टोबर) मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात आयपीएल २०२०चा ४८वा सामना झाला होता. या सामन्यादरम्यान समालोचन करताना इरफानने मुंबईच्या संघ व्यवस्थापनाशी संबंधित बरेच महत्त्वाचे किस्से सांगितले. तो म्हणाला की, “मी मुंबईव्यतिरिक्त आयपीएलच्या बऱ्याच संघांकडून खेळलो आहे. पण इतर संघांच्या तुलनेत मुंबईचे संघ व्यवस्थापन संघातील खेळाडूंची खूप काळजी घेते.”
“आयपीएलदरम्यान संघांना वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करावा लागतो. अशावेळी खेळाडू पूर्णपणे विश्रांती घेऊ शकत नाहीत. मात्र मुंबईच्या खेळाडूंबाबत असे घडत नाही. जर त्यांचा दिवस-रात्र सामना असेल, तर दूसऱ्या दिवशी त्यांची फ्लाइट दुपारी १२च्या आधी नसते. यामुळे खेळाडूंना त्यांची झोप पूर्ण करण्यात मदत मिळते. परंतु याउलट जर सकाळी ६ वाजता फ्लाइट असेल तर खेळाडूंना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागते,” असे पुढे बोलताना इरफानने सांगितले.
“तुम्हाला वाटत असेल की, या सर्व छोट्या गोष्टी आहेत. पण खेळाडूंना यातून खूप मदत मिळत असते आणि मुंबईचे संघ व्यवस्थापन या छोट्या-छोट्या गोष्टींची काळजी घेतात. त्यांना कधीही एका ठिकाणाहून दूसऱ्या ठिकाणी प्रवास करताना २ फ्लाइट बदलाव्या लागत नाहीत. त्यांच्यासाठी एकाच थेट फ्लाइटची व्यवस्था केली जाते. अशाप्रकारे त्यांच्याकडे वेळेलाही महत्त्व दिले जाते,” असे शेवटी बोलताना इरफान म्हणाला.
मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ
रोहित शर्माच्या नेतृत्तावाखालील मुंबई इंडियन्स संघ प्लेऑफमध्ये सामील झाला आहे. आयपीएल २०२०मध्ये पहिल्यांदा प्लेऑफमध्ये प्रवेश करणारा हा पहिला संघ ठरला आहे. त्यांनी आतापर्यंत हंगामातील १२ सामने खेळले असून त्यातील ८ सामने जिंकले आहेत. त्यामुळे सर्वाधिक १६ गुणांसह आणि १.१८६ नेट रन रेटसह मुंबई गुणतालिकेत अव्वल स्थानावर विराजमान आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
भारताला विश्वचषकात पराभूत करता न आल्याची ‘या’ दिग्गज खेळाडूला वाटतेय खंत
बाप रे बाप! साक्षी धोनीने चेन्नईच्या ‘या’ खेळाडूचे केले कौतुक
धोनीच्या चेन्नई संघातील ‘हा’ खेळाडू सर्वोत्कृष्ट अष्टपैलू असेल, गौतम गंभीरची भविष्यवाणी
ट्रेंडिंग लेख-
CSK vs KKR सामन्यात ऋतुराज गायकवाडसह ‘या’ खेळाडूंनी केले खास ५ विक्रम
अन् भारताचा सर्वात वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे क्रिकेटमधून कायमचा संपला
IPL 2020 – धोनीच्या ‘या’ पाच पठ्ठ्यांनी कोलकाताच्या सेनेला दाखवले आस्मान