पुणे मान्सून अश्वशर्यतीं हंगाम २०१९: अक्कासाहेब महाराज ट्रॉफी शर्यतीत आयर्न एज विजेता

पुणे। पुणे मान्सून अश्वशर्यतीं हंगाम 2019 या स्पर्धेत अक्कासाहेब महाराज ट्रॉफी या शर्यतीत आयर्न एज या घोड्याने 1200 मीटर अंतरावरच्या या मुख्य शर्यतीमध्ये चमकदार कामगिरी करत विजय मिळवला.

रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब (आरडब्लूआयटीसी) येथे सुरु असलेल्या या स्पर्धेतील अक्कासाहेब महाराज ट्रॉफी या महत्वाच्या लढतीत डीटी रेसिंग अँड ब्रिडर्स एल.एल.पी चे प्रतिनिधी डी आर ठाकेर, मंजिरी हॉर्स ब्रिडर्स फार्म प्रायव्हेट लिमिटेडचे प्रतिनिधी मिस्टर व मिसेस शापूरपी मिस्त्री आणि विक्रम डी शहा व एस.आर. सणस यांच्या मालकीच्या आयर्न एज या घोड्याने 1 मिनिट 10 सेकंद व 686 मिनीसेकंद वेळ नोंदवत अव्वल क्रमांक पटकावला. याचा पी त्रेवोर हा जॉकी होता, तर इम्तियाज सैत ट्रेनर होता.

सविस्तर निकाल:
अक्कासाहेब महाराज ट्रॉफी
विजेता:आयर्न एज,
उपविजेता: सेंट अँड्रीव्ज

You might also like

Leave A Reply