Tuesday, March 21, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विश्वचषकाच्या फायनलमध्ये भारतीय गोलंदाजी फोडण्यासाठी पाँटिंगने वापरलेली स्प्रिंगवाली बॅट? खरं घ्या जाणून

विश्वचषकाच्या फायनलमध्ये भारतीय गोलंदाजी फोडण्यासाठी पाँटिंगने वापरलेली स्प्रिंगवाली बॅट? खरं घ्या जाणून

March 5, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Ricky-Ponting

Photo Courtesy: Twitter/ICC


कपिल पाजींच्या टीम इंडियाने कोणाच्याही ध्यानी-मनी नसताना 1983 ला वर्ल्ड कप जिंकला. त्याच दिवसापासून भारतात खऱ्या अर्थाने क्रिकेट कल्चर सुरू झालं. असं असलं तरी पुढची फायनल खेळायला टीम इंडियाला वीस वर्षे वाट पाहावी लागली. जोहान्सबर्गच्या वॉन्डरर्स स्टेडियमवर ‘बीस साल बाद’ 2003मध्ये इंडिया फायनल खेळत होती‌. समोर डिफेंडिंग चॅम्पियन आणि अपराजित ऑस्ट्रेलिया होती.

ऑस्ट्रेलियाने पहिली बॅटिंग करायला सुरुवात केली आणि धूमधडाका उडवून दिला. गिलख्रिस्टने तलवारीसारखी बॅट चालवली आणि फिफ्टी मारून माघारीही गेला. त्यानंतर कोणतीही घाई न करता हेडन-पॉंटिंगने डाव पुढे नेला. हेडन पडला पण डॅमियन मार्टिन नडला. भारतीय बॉलिंग अगदी शिस्तबद्ध पद्धतीने ते खेळून काढत होते. गाडी 40 ओव्हरपर्यंत 240 पर्यंत पोहोचलेली. मात्र, तिथून पुढे खरा खेळ सुरू होणार होता.

ज्या ओव्हरमध्ये पॉंटिंगने फिफ्टी पूर्ण केली तिथेच गेम बदलला. हरभजनला त्याने खडे खडे दोन छक्के मारले. त्यातला एकतर स्टेडियमच्या बाहेरच गेला. जादूची कांडी फिरावी तसे पॉंटिंग आणि मार्टिनने गेअर चेंज केले. असं वाटत होत प्रत्येक बॉल हा सिक्स नाहीतर फोर जाणार. कुणीतरी यांना थांबवा म्हणून सारे जण देव गोळा करू लागले. मात्र ते दोघे शेवटपर्यंत काही थांबले नाहीत. 50 ओव्हरमध्ये इंडियन बॉलिंगचा घामटा काढून ते थांबले. पॉंटिंग नॉट आऊट 140 आणि मार्टिन नॉट आउट 88. ऑस्ट्रेलिया 359.

एवढा मोठा पहाड फोडायचा म्हटल्यावर सर्वांच्या आशा केंद्रित झालेल्या प्राईम फॉर्ममध्ये चाललेल्या सचिन तेंडुलकरवर. सारा वर्ल्डकप सचिनने गाजवलेला. पहिल्या ओव्हरच्या चौथ्या बॉलवर सचिनने फोर मारला. आता काय सचिन थांबत नसतोय असं म्हणणार इतक्यात पुढच्या बॉलला मॅकग्राने सचिनला लटकवला आणि वर्ल्ड कपचे स्वप्न जवळजवळ तुटलं. सेहवागन थोडाफार प्रयत्न केला, पण शेवटी एक लाजीरवाणा पराभव टीम इंडियाच्या पदरी पडला. पाँटिंगच्या घरादाराचा उद्धार होत होता. त्याचे भारतात जे काही चार-दोन फॅन असतील तेही त्याच्या नावाने बोटे मोडत होते.

सारा देश शोकसागरात बुडालेला. जणू काही सुतक पडलंय. जिथे-तिथे चर्चा फायनलचीच होती. अशाच चार दिवसांनी चर्चा होऊ लागली की, फायनल परत होणार आहे. कारण होतं पाँटिंगने चीटिंग केलेली. त्यानं त्याच्या बॅटमध्ये स्प्रिंगा ठेवलेल्या. ही बातमी वाऱ्यासारखी देशभरात पसरली. देशातील जवळजवळ 70टक्के जनतेचा याच्यावर विश्वास बसला. लोकांनी फायनलची तयारीही केली. गल्लीत, कट्ट्यावर, नाक्यावर, कॉर्पोरेट ऑफिस सगळीकडे हीच चर्चा होती. यात चार दिवसांनी डायरेक्ट पेपरमध्ये बातमी आली. एका इंग्लिश न्यूज पेपरने ठळक हेडिंगमध्ये लिहिलं की, ‘पाँटिंगच्या बॅटमध्ये स्प्रिंग होती… भारत ऑस्ट्रेलिया फायनल पुन्हा होणार.’ पूर्ण न्यूजमध्ये कशी पाँटिंगची बॅट वाढत होती, हे रंजकपणे सांगितलेलं. मात्र, न्यूजच्या शेवटी एप्रिल फूल जोक म्हणून सर्वांच्या अपेक्षांवर पाणी फेरलं गेलं. लोक 23 मार्चला झालेल्या वर्ल्डकप फायनलच्या दुःखात भारतीय इतके बुडाले होते की, 1 एप्रिलचा पेपर वाचताना त्यांना एप्रिल फूलची आठवणही राहिली नाही.

1999 🏆
2003 🏆
2007 🏆

Happy birthday to former 🇦🇺 captain, Ricky Ponting! 🙌 pic.twitter.com/AEcjgfLSeA

— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) December 19, 2018

शेवटी लोकांनी डोक्यातून हे खुळ काढून टाकलं. अचानक दोन वर्षांनी आयसीसीने ऑस्ट्रेलियाच्या काही खेळाडूंना चौकशीसाठी बोलावले. कारण होतं एक वेगळ्या प्रकारची बॅट वापरल्याच. कुकाबुराने तयार केलेल्या नव्या बॅटवर ग्रॅफाईटची पट्टी होती. योगायोगाने पाँटिंगही कुकाबुराचीच बॅट वापरायचा. पुन्हा चर्चा झाली, अरे वर्ल्डकप वेळेसच्या बॅटमध्ये पण असंच काहीतरी असेल. पुढे, आयसीसीने ग्रॅफाईट पट्टीवाल्या बॅट बॅन केल्या, आणि खेळाडूंना तंबी देत सोडून दिलं. अनेक वर्षानंतर 2020मध्ये पुन्हा सर्वांना पाँटिंगच्या बॅटची आठवण झाली. यावेळी स्वतः पाँटिंगने ती आठवण काढलेली. त्याने सोशल मीडियावरून फायनलची ऐतिहासिक इनिंग खेळलेल्या बॅटचा फोटो पोस्ट केला, तेव्हा मात्र फॅन्सने त्याला हक्काने विचारले, “आता तरी सांगा त्या बॅटमध्ये स्प्रिंग होत्या का?” मात्र उत्तर अजून आलं नाही.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बुमराहशी घेतलेला पंगा इंग्लंडला चांगलाच महागात पडला, लागोपाठ बाऊंसरचा मारा करत उडवलेली अँडरसनचीही झोप
सरफराजला का म्हटलं जातंय भारताचा डॉन ब्रॅडमन? पठ्ठ्याची डॉमेस्टिक कामगिरी आहे पुरावा, वाचाच


Next Post
Photo Courtesy: Twitter/WPL

दिल्लीसाठी ताराची 'फाईव्ह स्टार' कामगिरी! पहिल्याच सामन्यात रचला मोठा विक्रम

Indian-Men-And-Women-Team-Salary

अबब! सामना शुल्क सारखे, तरीही विराट-रोहितच्या वार्षिक पगाराच्या तुलनेत स्मृती-हरमनचा पगार झोप उडवणारा

Alan-Border-And-Imran-Khan

...आणि भर कॅफेत वर्ल्डकप विजेत्या कर्णधारांनी गल्लीतल्या पोरांसारखी केली भांडणे

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143