भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघातील दुसरा वनडे सामना शनिवारी (दि. 29 जुलै) बार्बाडोसच्याच मैदानावर पार पडला. एकतर्फी झालेल्या या सामन्यात यजमान संघाने 6 विकेट्सने विजय मिळवला. यासोबतच त्यांनी मालिकेत 1-1 अशी बरोबरीही साधली. भारतीय संघाचा पराभव झाला असला तरी, सलामीवीर ईशान किशन याची सातत्यपूर्ण कामगिरी भारतीय संघासाठी महत्त्वाची ठरली. यामुळे त्याने आता आपली संघातील जागा निश्चित केल्याचे सांगितले जात आहे.
या सामन्यात वेस्ट इंडिज संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. हा निर्णय योग्य ठरला. यावेळी भारतीय संघाने फलंदाजीला उतरत 40.5 षटकात सर्व विकेट्स गमावत 181 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना यजमान संघाने 36.4 षटकात 3 विकेट्स गमावत 182 धावा केल्या आणि 6 विकेट्सने सामना जिंकला.
भारतासाठी एकट्या ईशान किशन याने 55 चेंडूत 55 धावांची अर्धशतकी खेळी साकारली. यामध्ये 1 षटकार आणि 6 चौकारांचा समावेश होता. त्याने मालिकेतील पहिल्या सामन्यात देखील उत्कृष्ट कामगिरी करताना अर्धशतक झळकावले होते. तसेच, छोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर त्याने केवळ 33 चेंडूंमध्ये अर्धशतकाला गवसणी घातलेली.
त्याचा हा फॉर्म पाहता विश्वचषकात त्याची निवड निश्चित समजली जात आहे. यष्टीरक्षक फलंदाज म्हणून केल राहुल याची निवड होणार असल्याचे सांगितले जाते. मात्र, तो तंदुरुस्त नसल्यास ईशान हा ही जागा घेईल. राहुल तंदुरुस्त झाला तरी राखीव यष्टीरक्षक म्हणून ईशान यातला संधी मिळणे निश्चित मानले जातेय. दुसरीकडे कसोटी संघात रिषभ पंत तंदुरुस्त होईपर्यंत ईशान खेळणार असल्याचे बीसीसीआयचे सूत्र सांगत आहेत. ईशान रिषभ प्रमाणेच आक्रमक खेळ खेळत असल्याने, त्याने कसोटी संघातील आपली जागा देखील निश्चित केल्याचे बोलले जाते.
(Ishan Kishan Likely Selected For ODI World Cup Fix Wicketkeeper Slot In Test Team Also)
महत्वाच्या बातम्या –
कारकिर्दीतील शेवटच्या चेंडूवर ब्रॉडने मारला गगनचुंबी षटकार, व्हिडिओ पाहून फिरतील तुमचेही डोळे
‘ब्रॉडी तुला सलाम’, ब्रॉडच्या रिटायरमेंटवर आली युवीची प्रतिक्रिया, शेअर केले खास छायाचित्र