भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशन सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने नुकतेच बांगलादेशमध्ये द्विशतकही झळकावले होते. त्याचा चाहतावर्गही खूप मोठा आहे. अशातच त्याने असेे काहीतरी केले ज्यामुळे त्याच्यावर स्तुती सुमनांचा वर्षाव होत आहे. त्याने एका चाहत्याला एमएस धोनीच्या ऑटोग्राफजवळ ऑटोग्राफ देण्यास नकार दिला. त्याच्या या कृतीमुळे त्या चाहत्याला थोडेसे वाईट वाटले असेल, मात्र यामुळे किशनने लाखो लोकांचे मन जिंकले आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये लोक त्याची प्रशंसा करत आहे.
एक चाहत्याने ईशान किशन (Ishan Kishan) याला आपल्या फोनवर ऑटोग्राफ देण्याचा देण्याचा आग्रह केला. ईशान ऑटोग्राफ देण्यासाठी तयार होता. मात्र, जेव्हा त्याने पाहिले की त्या फोनवर अगोदरच एमएस धोनी (MS Dhoni) याचा ऑटोग्राफ केलेला आहे, तेव्हा त्यानेे नम्रपणे उत्तर दिले की मी अजून भारतीय संघाच्या माजी कर्णधाराच्या सहीजवळ ऑटोग्राफ देण्याच्या स्तरावर पोहोचलेलो नाही. त्या चाहत्याची अशी ईच्छा होती की, किशननेे धोनीच्या सहीच्या वर त्याचा ऑटोग्राफ द्यावा, पण किशनने त्यासाठी नकार दिला. मात्र, त्या चाहत्याचे मन राखण्यासाठी त्याने फोनवर धोनीच्या सहीच्या खाली आपला ऑटोग्राफ दिला.
"Mahi bhai (@msdhoni) ka hai signature and Mai unke Signature ke Uppar kaise karskata hoon. Abhi ham utna Pahuchne nahi hai wahan par. Ham Nichhe kardete hai. Theek hai."
– Ishan Kishan ❤️ pic.twitter.com/wc7gRpDJnz
— MASS (@BoyOfMasses) December 19, 2022
ईशान किशन आणि त्या चाहत्यामधील या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये किशनचा आवाज स्पष्ट ऐकायला येत आहे. किशन म्हणाला की, ” माही भाईची सिग्नेचर आधीच आहे. मी कुठे वरती घुसू ? धोनीच्या ऑटोग्राफजवळ ऑटोग्राफ देण्याच्या पोतळीवर अजून आम्ही पोहोचलेलो नाहीये. मी सही त्याच्या खाली केलेली चोलेल काय?”धोनी आणि ईशान किशन दोघेही झारखंडचे रहिवासी आहेत. काहीदिवसांपूर्वी किशनने या माजी कर्णधाराची स्तुती केली होती.
24 वर्षीय ईशान किशन याने एकदिवसीय क्रिकेेटमधील सर्वात सर्वात वेगवान द्विशतक झळकावण्याचा विश्व विक्रम आपल्या नावे केला. बांगलादेश विरुद्ध 10 डिसेंबरला चट्टोग्रामच्या मैदानावर त्याने ही कामगिरी केेली आणि त्यानंतर रणजी ट्रॉफीमध्ये देखील खेळताना दिसला होता. तो रणजी ट्रॉफीच्या या हंगामामध्ये झारखंड संघाचे प्रतिनिधित्व करत आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अर्रर्र, घरच्या मैदानावर पाकिस्तान गारद; करा’चीत’ इंग्लंडचा ऐतिहासिक विजय
FIFA क्रमवारीनुसार ब्राझील पहिल्या स्थानावर, तर चॅम्पियन अर्जेंटिना…