भारतीय संघ घरच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध मालिकेतील तिसरा आणि शेवटचा वनडे सामना रविवारी (15 जानेवारी) खेळणार आहे. तिरुअनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात तरी ईशान किशन किंवा सूर्यकुमार यांना संधी मिळावी अशी चाहत्यांची अपेक्षा आहे. ईशानने त्याच्या मागील वनडे सामन्यात विक्रमी द्विशतक केले होते. तसेच सूर्यकुमारने जो शेवटचा सामना खेळला त्यामध्ये आंतरराष्ट्रीय टी20 मधील तिसरे शतक झळकावले. अशी धडाकेबाज कामगिरी असूनसुद्धा या दोघांना का संधी दिली नाही, यावर आता फलंदाज प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी मौन तोडले आहे.
त्या दोघांना जबरदस्तीने बाकावर नाही बसवले. माझे म्हणणे आहे की, बाकी खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत. यामुळे सगळ्यांना माहित आहे त्यांना प्रतिक्षा ही करावीच लागेल. ते दोघे चांगला सराव करतात आणि जेव्हा त्यांना संधी मिळते तेव्हा ते अप्रतिम कामगिरी करतात, असे विक्रम राठोड म्हणाले.
राठोड यांनी सूर्यकुमारचे स्पष्टीकरत देताना म्हटले, “सूर्यकुमार एक चांगला फलंदाज आहे. तो सध्या चांगलाच फॉर्ममध्ये आहे. जेव्हा-जेव्हा त्याला संधी दिली जाते तेव्हा-तेव्हा तो संघासाठी महत्वाची भुमिका बजावतो. यामुळे वेळ येईल तेव्हा त्याला संधी दिली जाईल. त्याच्यासारखा खेळाडू संघात असणे महत्वाचे आहे.”
ईशान मधल्या फळीत फलंदाजी करू शकतो वर राठोड म्हणाले, “सध्यातरी त्याला सलामीवीर म्हणून घेतले आहे, मात्र ईशानसारख्या फलंदाजाची आवश्यकता असली तर नक्कीच आम्ही त्या खेळाडूला मधल्या फळीत फलंदाजीला पाठवू.”
भारतीय संघ श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत 2-0 असा पुढे आहे. पहिल्या सामन्यात शुबमन गिल याने सलामीला येत 60 चेंडूत 70 धावा केल्या होत्या. यामुळे दुसऱ्या सामन्यातही तोच रोहित शर्मा याच्याबरोबर सलामीला आला. सूर्यकुमार मधल्या फळीत फलंदाजी करतो. तेथे पाहिले तर विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांनी आतापर्यंत खेळल्या गेलेल्या सामन्यात अप्रतिम कामगिरी केली आहे. यामुळे तिसऱ्या वनडेत ईशान आणि सूर्यकुमारला अंतिम अकरामध्ये जागा मिळेल का हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
(Ishan Kishan & Suryakumar Yadav on the bench Batting coach Vikram Rathour finally broke his silence)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
एफसी गोवा संघासमोर नॉर्थ ईस्ट युनायटेडचे आव्हान, दोघांना चूक महागात पडणार
INDvSL: क्लीन स्वीप करण्यासाठी भारताच्या फलंदाजीत बदल अशक्य! पाहा दोन्ही संघाची संभावित प्लेईंग XI