सध्या भारत आणि न्यूझीलंड या संघामध्ये दुसरा टी20 सामना खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंडने नणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताकडून प्रथम फलंदाजी करण्यासाठी रिषभ पंत आणि इशान किशन तयार होते. मात्र, फलंदाजीला मैदानात उतरण्याच्या आधी ईशान किशनने असे काही केले ज्याने सगळीकडे हशा पिकला. इशानने चुकून दुसऱ्या खेळाडूचे बॅटिंग ग्लोव्ज घातलेले, जेव्हा त्याला ही गोष्ट लक्षात आली तेव्हा त्यानेे त्याचे ग्लोव्ज मागवून घेतले. तो प्रर्यंत दोन्ही फलंदाज सीमारेषेच्या बाहेर उभे होते.
या सामन्याच्या सुरुवातीला रिषभ पंत (Rishabh Pant) आणि इशान किशन (Ishan Kishan) हे दोन्ही डावखुरे फलंदाज मैदानात उतरण्यासाठी तयार होते. मात्र, मैदानात उतरण्याच्या आधी किशनला लक्षात आले की त्याने दुसऱ्या फलंदाजाचे बॅटिंग ग्लोव्ज घालून आला आहे. त्यानंतर त्याला त्याची चूक लक्षात आली आणि त्याने लगेच शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) याला आवाज देत स्वत:चे ग्लोव्ज मागवून घेतले. हे पूर्ण सत्र सुरु असताना समालोचकांनी या गोष्टीची चांगलच मज्जा घेतली.
भारताच्या डावाची सुरुवात रिषभ पंत आणि ईशान किशन या डावखुऱ्या फलंदाजांनी केली. नेहमीप्रमाणे भारताची सुरुवात निराशाजनक झाली. पंत अवघ्या 6 धावा करत बाद झाला. ईशानने डाव सावरत 31 चेंडूत 36 धावा केल्या. त्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने तुफान फलंदाजी करत झंझावती शतक ठोकले. त्यानेे 51 चेंडूत नाबाद 111 धावा केल्या. त्याच्या या वादळी खेळीच्या जोरावर भारताने 191 धावांचा डोंगर उभारला.
या आव्हानाचा सामना करण्यासाठी मैदानात उतरेलल्या न्यूझीलंड संघाची सुरुवात खराब झाली. भुवनेश्वर कुमारने पहिल्याच षटकात फिन ऍलेन (Finn Allen) याला तंबूत धाडले. त्यानंतर केन विलियम्सन (Kane Williamson) वगळता कोणालाही आपली छाप पाडता आली नाही आणि पूर्ण न्यूझीलंड संघ 126 धावांवर सर्वबाद झाला. या सामन्यात झंझावती शतक झळकवणाऱ्या सूर्यकुमारला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.(Ishan Kishan wore batting gloves of other batsman before entering in the ground)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भुवी आणि पहिल्या ओव्हरच नातचं खास! विरोधी फलंदाजाची शिकार करणार म्हणजे करणारच
भारताच्या क्रिकेट इतिहासात दुसऱ्यांदा घडली ‘ही’ विलक्षण घटना, सलामीला पहिल्यांदाच..