---Advertisement---

‘तेव्हा’ इशांत पहिल्यांदा ढसाढसा रडला होता; पत्नी प्रतिमाने सांगितला किस्सा

On: मंगळवार, फेब्रुवारी 23, 2021 4:45 PM
---Advertisement---

बुधवारी (२४ डिसेंबर) भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यानच्या तिसऱ्या कसोटीला अहमदाबाद येथे सुरुवात होत आहे. चार सामन्यांच्या मालिकेतील हा सामना जगातील सर्वात मोठे स्टेडियम असलेल्या मोटेरा स्टेडियमवर खेळविला जाईल. यावेळी भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्मा आपल्या कारकिर्दीतील शंभरावा कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरेल. त्याप्रसंगी इशांतची पत्नी प्रतिमा सिंगने त्याच्याविषयीच्या काही जुन्या आठवणींना उजाळा दिला.

तेव्हा इशांत खूप रडला होता
इशांतचा शंभरावा कसोटी सामना पाहण्यासाठी प्रतिमा अहमदाबाद येथे पोहोचली आहे. त्यावेळी एका मुलाखतीत तिने इशांत व आपल्याबद्दलच्या अनेक गोष्टींचा उलगडा केला.

२०१३ सालची एक घटना सांगताना ती म्हणाली, “ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोहाली वनडेत जेम्स फॉकनरने इशातच्या एका षटकात ३० धावा ठोकून संघाला एकहाती सामना जिंकून दिला होता. त्या रात्री इशांतने मला कॉल केला, तेव्हा तो पहिल्यांदा ढसाढसा रडला होता. मी त्याला समजावले की, हा खेळ आहे आणि यात चढ-उतार येत राहणार. तू हे सर्व विसरून फक्त खेळावर लक्ष केंद्रित कर.”

प्रतिमा ही राष्ट्रीय बास्केटबॉलपटू आहे. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी २०१६ मध्ये विवाह केला होता. प्रतिमाची बहिण आकांक्षा देखील भारतीय संघाकडून बास्केटबॉल खेळते.

इशांत खेळणार आहे आपला शंभरावा कसोटी सामना
अहमदाबाद येथे होणारा दिवस-रात्र कसोटी सामना इशांतच्या कारकिर्दीतील शंभरावा कसोटी सामना असेल. कपिल देव यांच्यानंतर १०० कसोटी सामने खेळणारा तो अवघा दुसरा वेगवान गोलंदाज ठरणार आहे. २००७ मध्ये बांगलादेश विरुद्ध कसोटी पदार्पण करणाऱ्या इशांतने आत्तापर्यंत ९९ कसोटी खेळताना ३०२ बळी आपल्या नावे केले आहेत. भारतासाठी सर्वाधिक कसोटी बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये तो सहाव्या स्थानी आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘केरळ एक्सप्रेस’ सुसाट! लिलावात दुर्लक्ष केल्यानंतर श्रीसंतचा बळींचा पंचक, फ्रँचायझींना सणसणीत चपराक

तब्बल १४.२५ कोटींचा धनी ठरलेल्या ‘मॅक्स’भाऊचा फ्लॉप शो, नेटकऱ्यांनी विराटच्या आरसीबीला केलं ट्रोल

‘या’ धाकड फलंदाजांना रिलीज करुन तोंडघशी पडली आरसीबी, एकाने तर केलीत ४ शतके

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---