क्राईस्टचर्च। उद्यापासून(29 फेब्रुवारी) हेगली ओव्हल स्टेडियमवर न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. हा 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना आहे.
या मालिकेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने विजय मिळवून 1-0 अशी आधीच आघाडी घेतली आहे. त्यामुळे भारताला या मालिकेतील पराभव टाळायचा असेल तर उद्यापासून सुरु होणाऱ्या कसोटी सामन्यात विजय आवश्यक असेल.
मात्र या सामन्याआधी भारताला मोठा धक्का बसला आहे. भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा दुसऱ्या कसोटी सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. इएसपीएनने दिलेल्या वृत्तानुसार त्याच्या घोट्याच्या दुखापतीने पुन्हा डोके वर काढल्याने तो उद्यापासून चालू होणाऱ्या कसोटी सामन्यात खेळण्याची शक्यता कमी आहे.
इशांतला मागील महिन्यात रणजी ट्रॉफीचा सामना खेळताना घोट्याची दुखापत झाली होती. ही दुखापत गंभीर होती. पण इशांत या दुखापतीतून 4 आठवड्यात सावरला. तसेच त्याने त्यासाठी फिटनेस टेस्टही दिली. या फिटनेस टेस्टमध्ये तो उत्तीर्ण झाल्याने पहिल्या कसोटीच्या काहीदिवस आधी तो न्यूझीलंडला पोहचला.
त्यानंतर त्याने पहिल्या कसोटीत शानदार कामगिरीही केली. त्याने न्यूझीलंडच्या पहिल्या डावात 5 विकेट्स घेण्याचा कारनामाही केला. मात्र आता तो दुसऱ्या कसोटीत खेळण्याची शक्यता नाही. त्याच्याऐवजी वेगवान गोलंदाज उमेश यादवला संधी मिळू शकते.
क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर! जयपुरबरोबर या शहरातही होणार राजस्थानचे आयपीएल सामने
https://t.co/7qBBRDa207#म #मराठी #IPL2020 #Cricket #IPL— Maha Sports (@Maha_Sports) February 28, 2020
मुंबईकर पृथ्वी शाॅच्या जागी हा खेळा़डू दूसऱ्या कसोटीतून करणार पदार्पण? https://t.co/1aWfwfQJgI#म #मराठी #cricket #TeamIndia #INDvsNZ
— Maha Sports (@Maha_Sports) February 28, 2020