भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. हा सामना येत्या १८ ते २२ जूनदरम्यान खेळला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय संघाने विलागिकरणाचा कालावधी पूर्ण करून कसून सरावाला सुरुवात केली आहे. भारतीय संघातील सर्वच खेळाडू चांगल्याच फॉर्ममध्ये आहेत. यामुळे कर्णधार विराट कोहलीसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला असेल की, या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला स्थान द्यावे?
मोहम्मद शमी, ईशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराह या अनुभवी वेगवान गोलंदाजांची तिकडी इंग्लंड दौऱ्यावरील २० सदस्यीय संघाचा भाग आहे. परंतु युवा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज देखील प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळवण्यासाठी प्रबळ दावेदार आहे.
मोहम्मद सिराजला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. या दौऱ्यावर त्याने चमकदार कामगिरी केली होती. इतकेच नव्हे तर तो भारतीय संघाकडून सर्वाधिक गडी (१३) बाद करणारा गोलंदाज ठरला होता.
टाइम्स ऑफ इंडियामधील वृत्तानुसार, भारतीय संघ कुठल्याही परिस्थितीत सिराजला भारतीय संघात स्थान देण्याच्या प्रयत्नात आहे. तर शमी, बुमराह आणि ईशांत यांनी गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावल्यामुळे कोणाला बाहेर बसवावे हा पेच निर्माण झाला आहे. अशातच असे म्हटले जात आहे की, ईशांतला विश्रांती देऊन सिराजला संघात स्थान दिले जाऊ शकते.
तब्बल ३०३ कसोटी विकेट्स घेणाऱ्या ईशांतने देखील इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या मागील कसोटी मालिकेत पुनरागमन केले होते. या मालिकेत त्याला ४ कसोटी सामन्यात अवघे ६ गडी बाद केले होते. परंतु त्याच्या गोलंदाजी शैलीमुळे पुन्हा एकदा त्याला संघाबाहेर केले जाऊ शकते.
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, साऊथम्प्टनमध्ये न्यूझीलंडच्या फलंदाजांविरूद्ध ईशांतची लांबलचक गोलंदाजी आणि नियमित बाऊन्सर गोलंदाजी करण्याची क्षमता शंकास्पद आहे. परंतु सिराज असे सतत करू शकतो. जेव्हा भारतीय संघ एकत्र सराव सुरू करेल, तेव्हा सिराज आपली पात्रता सिद्ध करेल. तसेच ईशांत एक उत्तम गोलंदाज आहे. परंतु तो सतत बाऊन्सर चेंडू टाकू शकत नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
मॅच फिक्सिंगमुळे १० वर्षांसाठी निलंबित झालेला ‘हा’ क्रिकेटपटू आता बनणार मॅच रेफरी!
झारखंडचा ‘हा’ खेळाडू सापडलाय आर्थिक संकटात, शेती करून भरतोय पोट
‘पुजारा खूप हळू खेळतो का?’, चाहत्याच्या प्रश्नावर ऑस्ट्रेलियन दिग्गजाचे मन जिंकणारे उत्तर