आयपीएलच्या 13 व्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सने किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध झालेल्या पहिल्याच सामन्यात विजय मिळविला होता. त्यांनी हा सामना सुपर ओव्हर मध्ये जिंकला होता. या विजयाने दिल्ली संघाचा आत्मविश्वास नक्कीच वाढला असेल. मात्र या संघासाठी एक वाईट बातमी आहे. संघातील अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्माला दुखापत झाली आहे.
पंजाबविरुद्धच्या पहिल्याच सामन्याआधी इशांतच्या पाठीला दुखापत झाली होती, त्यामुळे शुक्रवारी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध होणाऱ्या सामन्यातही तो खेळणार नाही. दिल्ली संघ व्यवस्थापनाच्या एका सदस्याने सांगितले की, त्याला आपल्या स्टार वेगवान गोलंदाजाचे महत्त्व माहीत आहे, त्यामुळे त्याला बरे होण्यासाठी वेळ द्यायचा आहे. मैदानात उतरण्यापूर्वी पुन्हा फॉर्म मिळविणासाठी इशांत शर्माकडे भरपूर वेळ आहे.
दिल्ली संघाच्या एका सदस्याने इंडिया टीव्हीला सांगितले, “इशांतला थोडा वेळ लागेल आणि एक किंवा दोन सामने तो गमावू शकतो. आम्ही त्याला संघात घेऊन जोखीम पत्करणार नाही. हा हंगाम नुकताच सुरू झाला आहे आणि तो संघातील एक महत्त्वाचा सदस्य आहे”
आयपीएलच्या मागील हंगामात इशांत शर्माने कागिसो रबाडाबरोबर चांगली गोलंदाजी केली होती. त्याने 7.58 च्या इकॉनॉमी रेटने 13 बळी मिळवले होते. आयपीएलच्या इतिहासात दिल्ली संघाने एकदाही जेतेपद मिळविले नाही. या हंगामात हा संघ खिताब जिंकण्याच्या उद्देशानेच मैदानात उतरला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-२ मोठे विक्रम केले पण ‘या’ गोष्टीमुळे मोठ्या विक्रमापासून रोहित शर्मा राहिला दूर
-एका मराठी चाहत्याला आपलं शेवटचं ट्विट करत या महान क्रिकेटपटूने जगातून घेतली एक्झिट
ट्रेंडिंग लेख-
-आयपीएलमध्ये एकाच षटकात ३० किंवा त्याहून अधिक धावा देणारे ७ गोलंदाज
-कसोटी क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर खेळणारे जगातील ३ सर्वोत्तम फलंदाज
-श्रीसंतने मिसबाहचा झेल पकडला आणि….