गोंबाऊ यांनी सांगितले की, आमचे दोन महत्त्वाचे सामने आहेत. आम्ही मोसमात एका वेळी एक सामना असे धोरण ठेवले आहे. समीकरण जर शक्यता सांगत असेल तर आम्ही त्यासाठी झुंज देऊ. आम्हाला एकाग्रता साधावी लागेल. आम्ही सराव चांगला करीत आहोत. विजय अनिवार्य असलेला हा सामना आहे. आम्ही उद्या जिंकलो तर पुढील सामन्यासाठी असाच दृष्टिकोन ठेवू. अंतिम सामना अशा दृष्टीने आम्ही तयारी केली आहे.
नॉर्थ ईस्ट 11 सामन्यात विजय पासून दूर आहे. त्यातच त्यांनी मुख्य प्रशिक्षक रॉबर्ट जार्नी यांना निरोप दिला आहे. त्यामुळे त्यांचा संघ विस्कळीत होऊ शकतो.
ओडिशाच्या संधळा सिस्को हर्नांडेझ आणि मॅन्युअल ओन्वू अशा आघाडी फळीतील खेळाडूंकडून दमदार खेळाची अपेक्षा असेल. ओडिशा कडे दाखल झाल्यापासून ओन्वू याने फॉर्म दाखवला आहे. नॉर्थ ईस्ट विरूद्ध टाँकायम राखण्यासाठी ओन्वू प्रयत्नशील असेल.
नॉर्थ ईस्ट संघाचे हंगामी प्रशिक्षक खालिद जमील यांनी सांगितले की, आम्हाला सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल. आम्हाला सर्वस्व पणाला लावावे लागेल. जार्नी यांच्या मार्गा नुसार आम्ही वाटचाल कायम ठेवू, केवळ काही किरकोळ बदल होतील.