दुबई: दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एन्रीच नॉर्जे म्हणाला की, दिल्ली कॅपिटल्सकडून इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या नेट प्रॅक्टिसमध्ये भाग घेण्यापूर्वी त्याला ‘तुरूंगवास’ झाल्यासारखे वाटले. १९ सप्टेंबरपासून सुरू होणार्या आयपीएलच्या १३ व्या सत्रापूर्वी युएईमध्ये आयोजित सराव सत्रात सामील झाल्याबद्दल नॉर्जेने आनंद व्यक्त केला आहे.
दिल्ली कॅपिटल संघात नॉर्जेने इंग्लंडच्या ख्रिस वॉक्सची जागा घेतली आहे. रविवारी त्यानी प्रथमच सराव केला. तो म्हणाला, “बाल्कनीऐवजी बाहेरच्या मैदानावर असणे चांगले आहे. मी हे व्यक्त करू शकत नाही पण असे वाटले की गेल्या काही दिवसांपासून मी तुरूंगात आहे, त्यामुळे बाहेर पडणे अतिशय चांगला क्षण आहे.”
28 वर्षीय वेगवान गोलंदाज म्हणाला, “पहिल्या दिवशी (सरावाने) मी जास्त जोर दिला नाही. हळूहळू वेगवान गोलंदाजी करेल, पण गोलंदाजी खूपच चांगली होती.”
नॉर्जेला मात्र युएईला जाण्यापूर्वी यावर्षी आयपीएल खेळण्याची अपेक्षा नव्हती. गेल्या वर्षी कसोटी मालिकेत विराट कोहलीला बाद करणार्या या गोलंदाजाने सांगितले की, “दिल्ली कॅपिटल्स या संघात असणे माझ्यासाठी फारच आश्चर्यकारक आहे.” मी संघात इतर खेळाडूच्या जागी उशीरा सामील झालो. मी जोपर्यंत विमानात बसलो नाही तोपर्यंत गोष्टी खरोखर घडत असल्याचा मला विश्वास नव्हता.”