युरोपमध्ये चालू असलेल्या युरो चषक २०२० अंतिम टप्प्यात आला आहे. नुकताच मंगळवारी (०६ जुलै) विम्बले येथे या स्पर्धेतील पहिला उपांत्य फेरी सामना कट्टर विरोधक इटली आणि स्पेन यांच्यात पार पडला आहे. उभय संघात झालेल्या रोमांचक लढतीत इटलीने स्पेनवर मात करत युरो चषकाच्या अंतिम सामन्यात धडक मारली आहे.
पेनल्टी शूटआउटवरुन लागला निर्णय
इटली आणि स्पेन यांच्यातील उपांत्य फेरी सामन्याची लढत धाकधूक वाढवणारी राहिली. एकवेळ सामना १-१ ने बरोबरीवर आल्याने पेनल्टी शूटआउटची वेळ ओढावली. अशात बचावासाठी ओळखला जाणारा इटली संघ स्पेनवर मात करतो की काय? असे वाटू लागले आणि झालेही तसेच. अखेर इटलीने पेनल्टी शूटआउटमध्ये स्पेनला ४-२ ने पराभूत करत अंतिम सामन्याचे तिकीट मिळवले.
दुसऱ्या उपांत्य फेरी सामना विजेत्याशी होणार लढत
इटली संघाने अंतिम सामन्यात धडक मारली आहे. आता त्यांचा विरोधक संघ दुसऱ्या उपांत्य फेरी सामन्याच्या निकालावर अवलंबून असेल. ७ जुलै रोजी युरो चषकाचा दुसरा उपांत्य फेरी सामना होणार आहे. या सामन्यात इंग्लंड आणि डेनमार्क संघ आमनेसामने असतील.
???? The winning moment for Jorginho and Italy! ⚽️????#EURO2020 pic.twitter.com/iX3c2KKa92
— UEFA EURO 2024 (@EURO2024) July 6, 2021
महत्त्वाचे म्हणजे, १९९६ नंतर पहिल्यांदाच इंग्लंडने युरो चषकाच्या उपांत्य फेरीत मजल मारली आहे. अशात विम्बले स्टेडियममध्ये होणाऱ्या या अटीतटीच्या सामन्यात डेनमार्कला पराभूत करत अंतिम सामन्याचे तिकीट मिळवण्यासाठी इंग्लंडचा संघ झगडताना दिसेल.
महत्त्वाच्या बातम्या-
हजारो प्रेक्षकांच्या साक्षीने ‘या’ खेळाडूने प्रेयसीला केले प्रपोज, व्हिडिओ होतोय व्हायरल
विजयाचा उन्माद! उपांत्य फेरीत प्रवेश केल्यानंतर खेळाडूंनी भर मैदानात काढल्या पॅन्ट