ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (Austrelia vs England) या दोन्ही संघांमध्ये ऍशेस मालिकेतील (Ashes series) तिसरा कसोटी सामना मेलबर्नमध्ये सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने विजय मिळवून मालिकेत २-० ची आघाडी घेतली आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून इंग्लंड संघाला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. परंतु इंग्लंड संघाला अवघ्या १८५ धावा करता आल्या. त्यानंतर पुन्हा एकदा जेम्स अँडरसनने इंग्लंड संघाचा डगमगत असलेला डाव सावरला आणि २३ षटक गोलंदाजी करत ४ गडी बाद केले. दरम्यान त्याने एक अप्रतिम झेल टिपण्याचा प्रयत्न केला, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
तर झाले असे की, इंग्लंड संघाची गोलंदाजी सुरू असताना, ऑस्ट्रेलिया संघाने ८ बाद २४५ धावा केल्या होत्या. त्यावेळी पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्क फलंदाजी करत होते. त्यावेळी जो रूटने गोलंदाजी करण्याची जबाबदारी मार्क वूडला दिली होती. त्याने १९ व्या षटकातील चौथ्या चेंडूवर ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सला अप्रतिम चेंडू टाकला. ज्यावर त्याने मिड ऑनच्या दिशेने शॉट खेळला.
त्यावेळी मिड ऑनला इंग्लंडचा दिग्गज खेळाडू जेम्स अँडरसन क्षेत्ररक्षण करत होता. चेंडू खूप वेगवान गतीने त्याच्याकडे गेला. डोळ्याची पापणी हलणार इतकाही वेळ नसताना जेम्स अँडरसनने उजव्या बाजूला डाईव्ह मारली आणि भन्नाट झेल टिपण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुर्दैवाने तो हा झेल पकडू शकला नाही. परंतु, त्याचा हा प्रयत्न पाहून, मैदानात उपस्थित असलेले प्रेक्षक देखील आश्चर्यचकित झाले होते. (James Anderson taken unbelievable catch watch video)
What An Effort By 39 Years Old James Anderson After Bowling 20 Overs 🐐
It could have been a great catch!
.
.#Cricket #AUSvENG #Ashes #Ashes21pic.twitter.com/doxY7U9qUw— CRICKETNMORE (@cricketnmore) December 27, 2021
ऑस्ट्रेलिया संघाला पहिल्या डावात फलंदाजी करताना २६७ धावा करण्यात यश आले आहे. तर इंग्लंड संघाचा पहिला डाव अवघ्या १८५ धावांवर संपुष्टात आला होता. आता पुन्हा एकदा इंग्लंड संघ फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला आहे. दुसऱ्या दिवसाच्या (२७ डिसेंबर) समाप्तीपर्यंत इंग्लंड संघाला ४ बाद ३१ धावा करण्यात यश आले आहे.
महत्वाच्या बातम्या :
SAvsIND, 1st Test, Live: दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच पावसाचा अडथळा; खेळ उशीराने होणार सुरू
वेदनादायक सुरुवात! बॉक्सिंग डे कसोटीत पुजारा शुन्यावर बाद; ‘हा’ नकोसा विक्रमही केलाय नावावर
हे नक्की पाहा: