Loading...

तिसऱ्या ऍशेस सामन्यासाठी असा आहे इंग्लंडचा संघ, हा अनुभवी खेळाडू सामन्यातून बाहेर

22 ऑगस्टपासून हेडिंग्ले, लीड्स येथे इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात ऍशेस मालिकेतील तिसरा कसोटी सामना सुरु होणार आहे. या सामन्यासाठी इंग्लंडच्या 12 जणांच्या संघाची घोषणा झाली आहे.

इंग्लंडने लॉर्ड्सवर झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील 12 जणांचाच संघच तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी कायम ठेवला आहे. याचाच अर्थ या सामन्याला अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन मुकावे लागणार आहे.

त्याला पहिल्या कसोटी सामन्यात पोटरीच्या दुखापतीचा त्रास झाला होता. त्यामुळे तो दुसऱ्या सामन्याला मुकला होता. आता तो तिसऱ्या सामन्यातूनही बाहेर पडला आहे. पण अँडरसनला लँकाशायर सेकंड इलेव्हन संघाकडून लीसिस्टरशायरविरुद्ध 20 ऑगस्टपासून होणाऱ्या सामन्यात खेळून उर्वरित दोन ऍशेस सामन्यांसाठी फिटनेस सिद्ध करावा लागणार आहे.

त्याचबरोबर तिसऱ्या कसोटी सामन्यासाठीही मोईन अलीला पुन्हा एकदा वगळण्यात आले आहे. तर जॅक लीचने संघातील स्थान कायम ठेवण्यात यश मिळवले आहे.

तसेच पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यात अंतिम 11 जणांच्या संघात संधी न मिळालेल्या सॅम करनला तिसऱ्या कसोटी सामन्यात 11 जणांच्या संघात संधी मिळणार का हे पहावे लागेल.

Loading...

तिसऱ्या ऍशेस कसोटीसाठी असा आहे इंग्लंडचा 12 जणांचा संघ – 

जो रूट (कर्णधार), जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), स्टुअर्ट ब्रॉड, रोरी बर्न्स, जॉस बटलर, सॅम करन, जो डेन्ली, जॅक लीच, जेसन रॉय, बेन स्टोक्स, ख्रिस वॉक्स.

Loading...

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

या कारणामुळे केन विलियम्सन, अकिला धनंजया सापडले अडचणीत, आयसीसी घेणार निर्णय

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेत हे दोन खेळाडू करणार टीम इंडीयाचे नेतृत्व

मोठी बातमी- ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का; स्टिव्ह स्मिथ तिसऱ्या ऍशेस सामन्यातून बाहेर

You might also like
Loading...