fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

वेळेवर मिळाले नाही उपचार, जपानमध्ये सुमो पैलवानाचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू

Japani sumo wrestler shobushi dies at 28 after contracting covid 19

संपूर्ण जग सध्या कोरोना व्हायरसच्या विळख्यात सापडले आहे. त्यामुळे आतापर्यंत बऱ्याच लोकांना आपला जीव गमवावा आहे. जपानचा एक २८ वर्षीय सुमो पैलवान सोबुशी हा कोविड-१९ने संक्रमित झाला होता. या महामारीशी जवळपास १ महिना संघर्ष केल्यानंतर त्याच्या शरीरातील अनेक भागांना इजा पोहचली आणि अखेर बुधवारी सकाळी (१३ मे) त्याचा मृत्यू झाला. तो टोकियोच्या तकादागावा संघाचा सुमोपटू होता. Japani sumo wrestler shobushi dies at 28 after contracting covid 19.

कोविड-१९मुळे कोणत्या पैलवानाचा मृत्यू झाल्याची ही पहिलीच घटना आहे. यावर जपान सुमो संघाने सांगितले की, “या (सोबुशी) पैलवानाला ४-५ एप्रिलला ताप आला होता. पण, फोन व्यस्त असल्यामुळे त्याला कोणत्याही आरोग्य अधिकाऱ्याशी संपर्क साधता आला नाही. एवढेच नव्हे तर, त्याला कोणत्याही दवाखान्यात भरती करून घेण्यात आले नव्हते.”

“शेवटी जेव्हा त्याच्या खोकल्यातून रक्त निघायला सुरुवात झाली. तेव्हा ८ एप्रिलला टोकियोच्या एका दवाखान्यात त्याला भरती करण्यात आले. तिथे त्याची कोरोना व्हायरसटी चाचणी केल्यानंतर ती निगेटिव्ह निघाली. पण त्यानंतर १० एप्रिलला त्याने दुसऱ्या दवाखान्यात तपासणी केल्यावर तो पॉझिटिव्ह असल्याचे आढळले. त्यामुळे तिथे त्याला १९ एप्रिलपासून अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. पण, अखेर त्याच्या शरीराच्या बऱ्याच भागांनी काम करणे बंद केल्यामुळे त्याचा १३मे ला मृत्यू झाला.”

सुबोशीचा मृत्यु ही आमच्यासाठी एक धक्कादायक बातमी असल्याचे, सुमो संघाचे प्रमुख हक्काकु यांनी सांगितले. तर, जपानच्या खालच्या श्रेणीतील अनेक पैलवान आणि प्रशिक्षणार्थी यांनाही कोविड-१९ची लागण झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे जपान सुमो असोसिएशनने १ हजारपेक्षा जास्त पैलवानांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जपानच्या क्रिडा क्षेत्रातील हे आतापर्यंतचे सर्वात मोठे चाचणी अभियान ठरेल.

जपानमध्ये सुमो स्पर्धा खूप लोकप्रिय असतात. पण, कोविड-१९मुळे मार्चमधील सुमोची स्पर्धा बंद स्टेडियमध्ये घेण्यात आली होती. तर, सुमो असोसिएशनने उन्हाळ्यात होणाऱ्या सुमोच्या अन्य स्पर्धा २४ मेपर्यंत स्थगित केल्या आहेत.

तसेच, जपानमधील फुटबॉल आणि इतर क्रिडास्पर्धाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यात ऑलिंपिकचाही समावेश आहे. यावर्षीच्या २४ जुलैपासून ते ९ ऑगस्टपर्यंत ऑलिंम्पिक स्पर्धा होणार होत्या. पण, कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे ऑलिंम्पिकचे आयोजन २३ जुलै ते ८ ऑगस्ट २०२१मध्ये करण्यात येणार आहे.

ट्रेंडिंग घडामोडी-

रोहित, कोहलीमुळे बीसीसीआय वैतागली, मोहम्मद शमीचं मात्र नाही काहीच…

ना विराट; ना पृथ्वी शाॅ, हाच आहे भारताचा अंडर १९चा टाॅप कर्णधार

एमएस धोनीचे कर्णधार म्हणून घेतलेले खतरनाक ३ निर्णय, ज्यांनी सामना एकहाती फिरवला

You might also like