भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून या दौऱ्यावर तिन्ही प्रकारच्या क्रिकेट मालिकेचे आयोजन होणार आहे. 27 नोव्हेंबर पासून वनडे सामन्यांच्या मालिकेने या दौऱ्याला सुरुवात होईल. त्याआधी ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज जेसन गिलेस्पीने भारतीय गोलंदाजांचे कौतुक केले आहे.
स्पोर्टस्टार या मॅगझीनच्या प्रतिनिधीशी नुकत्याच झालेल्या एका संभाषणात गिलेस्पीला पूर्वीच्या भारतीय वेगवान गोलंदाजीची सध्याच्या भारतीय वेगवान गोलंदाजीसोबत तुलना करण्यास सांगितले. याचे उत्तर देताना गिलस्पीने भारतीय वेगवान गोलंदाज बुमराहबद्दल मोठी भविष्यवाणी केली आहे.
पूर्वीच्या गोलंदाजांच्या आक्रमणासारखेच या पिढीच्या गोलंदाजांचे आक्रमण
भारताच्या वेगवान गोलंदाजीबद्दल बोलताना गिलेस्पी म्हणाला, “ते वेगवेगळ्या प्रकारे वेगवान गोलंदाजी करतात. मला वाटते की सध्याच्या भारतीय वेगवान गोलंदाजांचे आक्रमण पूर्वीच्या भारताच्या वेगवान गोलंदाज्यांच्या आक्रमणासारखेच चांगले आहे.”
बुमराह तिन्ही प्रकारात भारताचा महान गोलंदाज बनेल – गिलस्पी
गिलस्पी बुमराहचे कौतुक करताना म्हणाला की, “भारताचा हा गोलंदाजी विभाग चांगला आहे. बुमराह आपल्या कारकीर्दीच्या समाप्तीनंतर सुपरस्टार गोलंदाज ठरणार आहे. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत तो भारताचा महान खेळाडू बनणार आहे. याबद्दल काहीही शंका नाही.”
इशांत आणि शमीचे केले कौतुक
“मोहम्मद शमी उत्कृष्ट आहे. इशांत शर्माने दाखवून दिले आहे की तो किती अनुकूल आहे. त्याने काही चढउतार पाहिले आहेत, परंतु खरोखर लवचिकता दर्शविली आहे. तो नेहमीच स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करत असतो.”असेही पुढे बोलताना गिलस्पी म्हणाला
भुवनेश्वर लवकरच तंदुरुस्त होईल अशी अशा
“भारतीय संघाने आपले कार्य यशस्वीपणे पार पाडले आणि स्वत:ला बळकट करण्याचे मार्ग शोधले. याचा भारताला अभिमान वाटला पाहिजे. मग भुवनेश्वर कुमारसारखे गोलंदाज या संघाला मिळाले. तो सध्या जखमी आहे. आशा आहे की तो लवकरच तंदुरुस्त होईल”
‘हा’ दोन पिढीच्या गोलंदाजीतील सर्वात मोठा फरक
दोन पिढ्यांमधील खेळाडूंची तुलना करताना गिलेस्पी म्हणाला की, ” जवागल श्रीनाथ शानदार गोलंदाज होता. बहुधा काही प्रसंगी त्याने मला मागे टाकले. झहीर खाननेही भारतीय वेगवान गोलंदाजीत विशेष कामगिरी केली. दोन पिढीची तुलना करणे अवघड आहे. परंतु तेव्हाच्या आणि आताच्या वेगवान गोलंदाजीमधील सर्वात मोठा फरक म्हणजे संघात वेगवान गोलंदाजांचा भरणा. पूर्वीच्या संघात या पिढीतील गोलंदाजांसारखाच भरणा होता याची मला खात्री नाही.”
महत्त्वाच्या बातम्या –
विराट कोहलीच्या टीम इंडियाला आव्हान देण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा ‘हा’ युवा गोलंदाज सज्ज
व्वा! मेगा लिलाव झाला, तर हैदराबाद करणार ‘या’ दमदार खेळाडूला रिटेन; वॉर्नरचे संकेत
भन्नाटच! WBBL मधील ‘हा’ एकहाती झेल पाहुन तुम्हीही व्हाल थक्क
ट्रेंडिंग लेख –
ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या सुवर्णकाळातील ‘अखेरचा’ शिलेदार
सचिनची ‘ती’ खेळी कधीच विसरली जाणार नाही
भारतीय प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालेले ३ ऑस्ट्रेलियन क्रिकेटर