Loading...

विंडीजचा कर्णधार जेसन होल्डरला मिळाला हा मोठा पुरस्कार

वेस्ट इंडीजचा वनडे आणि कसोटी संघाचा कर्णधार जेसन होल्डरला वेस्ट इंडीजचा या वर्षातील सर्वोत्तम कसोटीपटूचा पुरस्कार मिळाला आहे.

त्याच्या नेतृत्वाखाली 2018मध्ये वेस्ट इंडीजने मायदेशात श्रीलंका विरुद्ध झालेल्या 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली होती. तसेच बांगलादेशला 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0ने पराभूत केले होते.

होल्डरने 2018मध्ये कसोटीत 6 सामन्यात 336 धावा केल्या आहेत. तसेच 33 विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान होल्डरने वनडेमध्ये 405 धावा आणि 21 विकेट्स देखील घेतल्या होत्या. 

होल्डर हा आयसीसीच्या अष्टपैलू खेळाडूंच्या कसोटी क्रमवारीतही सध्या अव्वल क्रमांकावर आहे.

वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डच्या या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्यात होल्डर व्यतिरिक्त शाय होपला वर्षातील सर्वोत्तम वनडे क्रिकेटपटूचा पुरस्कार देण्यात आला. त्याने 2018 मध्ये 67.30 च्या सरासरीने 875 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 3 शतकांचा आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे.

Loading...

तसेच किमो पॉलला वेस्ट इंडिजचा वर्षातील सर्वोत्तम टी20 क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळाला. त्याने मागीलवर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने मागीलवर्षी 13 टी20 सामन्यात 17 विकेट्स घेतल्या आणि 124 धावा केल्या आहेत.

याबरोबरच ओशान थॉमसला उदयोन्मुख खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला. तर रहकिम कॉर्नवॉलची वेस्ट इंडीज चॅम्पियनशीप प्लेअर ऑफ द इयर म्हणून निवड करण्यात आली. तसेच आंद्रे रसलला सर्वोत्तम कॅरेबियन टी20 खेळाडूचा पुरस्कार मिळाला.

त्याचबरोबर महिलांच्या पुरस्कारांमध्ये अष्टपैलू डिएंड्रा डॉटिनला तीनही महत्त्वाचे पुरस्कार मिळाले. तीला वेस्ट इंडीजची कसोटी, वनडे आणि टी20 ची सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू हे तीनही पुरस्कार मिळाले.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

निलंबनातून दिलासा मिळाल्यानंतर श्रीसंतने व्यक्त केली ही खास इच्छा!

नव्या कसोटी जर्सीत दिसली टीम इंडिया, पहा फोटो

Loading...

पाकिस्तानचा गोलंदाज हसन अली या भारतीय मुलीबरोबर अडकला लग्नबंधनात

You might also like
Loading...