इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील दुसरा कसोटी सामना गुरुवारीपासून (१२ ऑगस्ट) सुरू झाला आहे. लॉर्ड्सच्या मैदानावर हा सामना खेळला जात असून दुसऱ्या सामन्यातील पहिल्या डावात दोन्ही संघांनी उत्कृष्ट फलंदाजी केली. इंग्लंडचा कर्णधार जो रूटच्या दीडशतकीय खेळीमुळे इंग्लंडचा पहिला डाव सावरला.
पहिल्या कसोटी सामन्यात आपल्या गोलंदाजीच्या जोरावर जसप्रीत बुमराहने चांगलीच कमाल केली होती. त्याने सामन्यातील पहिल्या डावात ४ तर दुसऱ्या डावात ५ विकेट घेतल्या होत्या, ज्यामुळे भारतीय संघ मजबूत स्थितीत होता. भारत पहिला कसोटी सामना जिंकण्याच्या उंबरठ्यावर होता परंतु ५ व्या दिवशीच्या पावसामुळे सामना अनिर्णित राहिला होता.
मात्र, दुसऱ्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी गोलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघातील वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने अनपेक्षित प्रदर्शन केले. त्याने इंग्लंडच्या डावादरम्यान एकूण १३ नो बॉल फेकले. ज्यामुळे जसप्रीत बुमराह सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. सामन्याच्या १२६ व्या षटकांत तर बुमराहने तब्बल ४ नो बॉल टाकले. यामुळे बुमराहचे षटक १५ मिनिट चालले. बुमराहने या षटकात चौथ्या चेंडूवर नो बॉल टाकला. मग पाचव्या चेंडूवर एकदा आणि पुन्हा सहाव्या चेंडूवर दोन वेळा, असे एकूण ४ नो बॉल टाकले.
या षटकाला १५ मिनिटे लागण्याचे आणखी एक कारण होते ते म्हणजे, बुमराहच्या षटकातील पहिला चेंडू जेम्स अँडरसनच्या हेल्मेटवर लागला. ज्यानंतर ‘कनक्शन प्रोटोकॉल’नुसार त्याची पडताळणी करण्यात आली. यादरम्यानच खूप वेळ गेला, त्यामुळे बुमराहचे ते षटक १५ मिनिट चालले.
दरम्यान, दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने पहिल्या डावात ३६४ धावा केल्या होत्या. तर इंग्लंडच्या संघाने कर्णधार जो रूटच्या नाबाद १८० धावांच्या खेळीवर ३९१ धावा बनवल्या. ज्यामुळे इंग्लंड संघाला तिसऱ्या दिवशी २७ धावांची बढत मिळाली. यात भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराजला ४ विकेट मिळाल्या. ईशांत शर्माला ३ विकेट मिळाल्या. तर मोहम्मद शमीला २ विकेट मिळाली. पहिल्या डावात बुमराहला बिना विकेटचेच समाधान मानावे लागले.
महत्वाच्या बातम्या –
–लॉर्ड्स कसोटीत नेहराच्या तोंडून निघाले असे शब्द अन् पुढच्याच चेंडूवर पंत बाद, झाला भरपूर ट्रोल
–इशांत अन् कर्णधार विराटने असा डावपेच आखून इंग्लंडच्या २ अष्टपैलूंचा केला गेम, व्हिडिओ व्हायरल
–नॉटिंघम कसोटीचा हिरो लॉर्ड्समध्ये बनला विलेन, चाहत्यांवर आली ‘बुमराह प्लिज नो बॉल’ म्हणण्याची वेळ