भारत आणि दक्षिण अफ्रिका (sa vs ind odi series) यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना बुधवारी (१९ जानेवारी) खेळला गेला. या सामन्यात भारताचा वेगवान गोललंदाज जसप्रीत बुमराह (jasprit bumrah) याने जानेमन मलान याची विकेट घेतली आणि सोबतच मागच्या तीन वर्षांचा दुष्काळ देखील संपवला. बुमराहने या सामन्यात दक्षिण अफ्रिकेच्या दोन महत्वाच्या विकेट्स घेतल्या आणि विरोधी संघाला २९६ धावसंख्येवर रोखले.
बुमहारने मलानची विकेट सामन्याच्या पावरप्लेमध्ये घेतल्यामुळे मागच्या तीन वर्षंपासून तो ज्या गोष्टीची वाट पाहत होता, ती साध्य झाली आहे. बुमराहने यापूर्वी २०१९ विश्वचषकादरम्यान पावर प्लेमध्ये एका खेळाडूची विकेट घेतली होती. त्यानंतर बराच काळ उलटून गेला होता, पण बुमराहला पावर प्लेमध्ये विकेट मात्र मिळत नव्हती.
व्हिडिओ पाहा- २०११ विश्वचषक भारताचे हिरो, ज्यांचे योगदान आज कोणाला आठवत नाही |
त्याने २०१९ विश्वचषकात उपांत्य सामन्याच्या पावर प्लेमध्ये त्याने शेवटची विकेट घेतली होती. या सामन्यात भारतासमोर न्यूझीलंड संघाचे आव्हान होते. न्यूझीलंडचा सलामीवीर फलंदाज मार्टिन गप्टिल याला बुमराहने बाद करून तंबूत पाठवले होते. त्यानंतर जवळपास तीन वर्षांचा कालावधी निघून गेला. या मधल्या काळात बुमराहने एकूण २३३ चेंडू टाकले आणि १७० धावा खर्च केल्या. यादरम्यान त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सहा आणि न्यूझीलंडविरुद्ध तीन सामने खेळले, पण एकाही सामन्याच्या पावर प्लेमध्ये त्याला विकेट मिळाली नव्हती.
२०१९ विश्वचषकानंतर जसप्रीत बुमराह त्याच्या अपेक्षित फॉर्ममध्ये दिसला नाही. बुमराहने २०२० मध्ये निराशाजनक प्रदर्शन केले आणि यादरम्यान ९६.४० च्या सरासरीने गोलंदाजी करत फक्त ५ विकेट्स घेतल्या. यादरम्यान त्याचा इकोनॉमी रेट ५.६२ होता, जो आतापर्यंतचा कारकिर्दीतील त्याचा सर्वात जास्त इकोनॉमी रेट होता. त्यानंतर २०२१ मध्ये त्याने एकही एकदिवसीय सामना खेळला नाही.
पुढच्या वर्षी आयसीसी विश्वचषकाचे आयोजन केले जाणार आहे. जर विश्वचषकापूर्वी बुमराहने फॉर्ममध्ये सुधारणा केली नाही, तर भारतीय संघाला त्याचा नक्कीच फटका बसणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
भारतीय गोलंदाजांची दाणादाण उडवत बावुमा-डूसेनची जोडी ‘सुपरहिट’! द्विशतकी भागिदारीसह रचला इतिहास
भारतीय गोलंदाजांची पिसं काढत दक्षिण आफ्रिकी कर्णधाराचं खणखणीत शतक, केला ‘हा’ खास पराक्रम
किंग कोहली इज बॅक..! सचिनचा ‘हा’ कुणी मोडेल असं वाटलंही नव्हतं पण विराटने आज मोडलाच
व्हिडिओ पाहा –