भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने ८ विकेट्सने शानदार विजय मिळवला. याबरोबर कसोटी मालिकेत भारताने १-१ अशी बरोबरी साधली. या सामन्यात भारतीय संघाने सांघिक कामगिरीचे जोरदार प्रदर्शन केले. यात विशेषकरुन आर अश्विन, अजिंक्य रहाणे, रविंद्र जडेजा व जसप्रीत बुमराहने विशेष चमकदार कामगिरी केली. रहाणेला जरी सामनावीर पुरस्कार देण्यात आला असला, तरी या सामन्यात बुमराहने केलेली अप्रतिम कामगिरीही दुर्लक्षित करता येत नाही.
भारतीय संघाने गेल्या तीन वर्षात परदेशात काही शानदार विजय मिळवले आहे. आशिया खंडाबाहेर दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड किंवा वेस्ट इंडिजविरुद्ध भारतीय संघाने जे विजय मिळवले त्यात बुमराह भारतीय संघासाठी सर्वात महत्त्वाचा गोलंदाज ठरला आहे. बुमराह संघात असताना भारतीय संघाने जेव्हा जेव्हा परदेशात (आशिया खंडाबाहेर) विजय मिळवलाय तेव्हा तेव्हा बुमराहने ७ कसोटीत तब्बल १३.८३च्या सरासरीने तब्बल ४८ विकेट्स घेतल्या आहेत.
भारताने दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया व वेस्ट इंडिज देशांत कसोटी विजय मिळवताना बुमराने अफलातून कामगिरी केली आहे. त्याने ७ कसोटीत तब्बल ५ वेळा डावात ५ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे.
भारताने आशिया खंडाबाहेर विजय मिळवलेल्या कसोटी सामन्याती बुमराहची कामगिरी-
जोहान्सबर्ग: ५-५४ आणि २-५७
ट्रेंट ब्रिज: २-३७ आणि ५-८५
ऍडलेड: ३-४७ आणि ३-६८
मेलबर्न: ६-३३ आणि ३-५३
ऍंटिग्वा: १-५५ आणि ५-७
किंगस्टन: ६-२७ आणि १-३१
मेलबर्न: ४-५६ आणि २-५४