भारतीय संघ (Indian team) दक्षिण आफ्रिकेविरुद्धची ऐतिहासिक कसोटी मालिका जिंकण्यासाठी केपटाऊनमध्ये (Capetown) दाखल झाला आहे. भारतीय संघ मंगळवार (११ जानेवारी) पासून यजमान दक्षिण आफ्रिका विरुद्ध तिसऱ्या कसोटी (Sa vs Ind 3rd test) सामन्यात दोन हात करणार आहे. भारतीय संघाने आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दक्षिण आफ्रिकेत एकही कसोटी मालिका आपल्या नावावर केली नाहीये. त्यामुळे ही मालिका जिंकून भारतीय संघाला इतिहास रचण्याची सुवर्णसंधी असणार आहे.
या मालिकेतील तिसरा कसोटी सामना केपटाऊनच्या मैदानावर पार पडणार आहे. या मैदानावर वेगवान गोलदाजांचा बोलबाला असतो. दरम्यान केपटाऊनमध्ये दाखल होताच, भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने एक पोस्ट शेअर केली आहे, जी सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
भारतीय संघातील वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. त्याने सराव सत्र झाल्यानंतर आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यावर त्याने कॅप्शन म्हणून, “केपटाऊन जानेवारी २०१८, जिथे मी माझे कसोटी पदार्पण केले. ४ वर्षांनंतर मी एक खेळाडू आणि एक व्यक्ती म्हणून मोठा झालो आणि या मैदानावर परत आल्याने काही खास आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत.” (Jasprit bumrah emotional post)
जसप्रीत बुमराहसाठी केपटाऊनचे न्यूलॅंड्स मैदान खूप खास आहे. कारण याच मैदानावर जसप्रीत बुमराहने आपल्या कसोटी कारकिर्दीला प्रारंभ केला होता. ४ वर्षांपूर्वी त्याने याच मैदानावर कसोटी कारकिर्दीतील पहिला सामना खेळला होता.
https://www.instagram.com/p/CYgrt1TqhwT/?utm_medium=copy_link
तसेच जसप्रीत बुमराहच्या पहिल्या कसोटी सामन्याबद्दल बोलायचं झालं तर त्याने या सामन्यात अप्रतिम कामगिरी केली होती. त्याने या सामन्यात एकूण ४ गडी बाद केले होते. ज्यामध्ये पहिल्या डावात त्याला १ तर दुसऱ्या डावात त्याला ३ गडी बाद करण्यात यश आले होते. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीत पहिला बळी एबी डिविलियर्सचा घेतला होता. परंतु या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. यावेळी तो भारतीय संघातील एक प्रमुख गोलंदाज म्हणून मैदानात उतरणार आहे. त्यामुळे त्याच्यावर मोठी जबाबदारी असणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
‘किंग कोहली’ एका इंस्टाग्राम पोस्टमधून कमावतो कोट्यावधी रुपये, आकडा ऐकून बसेल धक्का
केपटाऊन कसोटीपूर्वी यजमान घेणार धक्कादायक निर्णय? प्लेइंग इलेव्हनमध्ये…
हे नक्की पाहा:






