क्रिकेटटेनिस

बुमराहने रचला इतिहास, 6 वर्षांनंतर भारतीयाने जिंकला ‘कसोटी क्रिकेटर ऑफ द इयर’ पुरस्कार

भारताचा दिग्गज वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) 2024मध्ये भारतासाठी प्रत्येक सामन्यात धारदार गोलंदाजी केली. त्याने एकट्याच्या दमावर भारतीय संघाला अनेक सामन्यात विजय देखील मिळवून दिले. दरम्यान त्याच्या या अथक परिश्रमामुळे त्याला आयसीसीचा वर्षातील सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. अशाप्रकारे, जवळजवळ 6 वर्षांनंतर एका भारतीय क्रिकेटपटूची आयसीसीचा वर्षातील सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटू म्हणून निवड झाली आहे.

जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) व्यतिरिक्त, इंग्लंडचा जो रूट (Joe Root), हॅरी ब्रूक (Harry Brook) आणि श्रीलंकेचा कामिंदु मेंडिस (Kamindu Mendis) यांना या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते, परंतु बुमराहने यांना मागे टाकत बाजी मारली.

जसप्रीत बुमराह हा आयसीसीचा वर्षातील सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटूचा पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज आहे. त्याच वेळी, एका भारतीय क्रिकेटपटूला जवळजवळ 6 वर्षांनी आयसीसीचा वर्षातील सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळाला आहे. यापूर्वी, विराट कोहलीला (Virat Kohli) 2018चा ‘आयसीसी कसोटी क्रिकेटर ऑफ द इयर’ पुरस्कार देण्यात आला होता. अलिकडेच झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये (Border Gavaskar Trophy) बुमराहची कामगिरी उत्कृष्ट होती. त्याने 32 विकेट्स घेतल्या होत्या.

2024मध्ये जसप्रीत बुमराहने कसोटी फाॅरमॅटमध्ये सर्वाधिक 71 विकेट्स घेतल्या. दरम्यान, इंग्लंडचा गस अ‍ॅटकिन्सन या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. गस अ‍ॅटकिन्सनने 52 विकेट्स घेतल्या. बुमराहने 15 पेक्षा कमी सरासरीने फलंदाजांना बाद केले. अशाप्रकारे, बुमराहने गस अ‍ॅटकिन्सनपेक्षा 19 जास्त विकेट्स घेतल्या.

बुमराहच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने भारतासाठी 45 कसोटी, 89 वनडे आणि 70 टी20 सामने खेळले आहेत. 45 कसोटीत त्याने 19.40च्या सरासरीने 205 विकेट्स घेतल्या आहेत. 89 वनडे सामन्यात त्याने 23.55च्या सरासरीने 149 विकेट्स घेतल्या आहेत. दरम्यान त्याची सर्वोत्तम गोलंदाजी 19 धावात 6 विकेट अशी आहे. 70 टी20 सामन्यात त्याने 89 विकेट्स घेतल्या आहेत. तर टी20 मधील त्याची सर्वोत्तम गोलंदाजी 7 धावात 3 विकेट्स अशी आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

“एबी डिव्हिलियर्स आयपीएलमध्ये चुकीच्या फ्रँचायझीकडू खेळला” माजी क्रिकेटपटूचा विराटच्या RCBवर निशाणा
स्म्रीती मानधनाने पटकावला ‘आयसीसी महिला वनडे क्रिकेटर ऑफ इयर’ पुरस्कार…!
IND vs ENG; मोहम्मद शमीची भारताला गरज नाही? काय म्हणाले बीसीसीआय सूत्र

Related Articles