क्रिकेटटॉप बातम्या

जसप्रीत बुमराहची हवा, जिंकला आयसीसी ‘प्लेयर ऑफ द मंथ’ पुरस्कार…!

नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (ICC) डिसेंबर 2024 महिन्यातील ‘प्लेयर ऑफ द मंथ’ पुरस्कार विजेत्यांची घोषणा करण्यात आली. यामध्ये भारतीय संघाचा प्रमुख व स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) पुरुषांच्या गटातून दिला जाणारा आयसीसीचा हा पुरस्कार पटकावला. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) सुद्धा या शर्यतीत होता, परंतु त्याला मागे टाकत बुमराहने बाजी मारली.

जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) हा पुरस्कार दुसऱ्यांदा आपल्या नावावर केला आहे. 2 वेळा पुरस्कार पटकावणारा तो जगातील पहिलाच गोलंदाज ठरला आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या (Border Gavaskar Trophy) 3 कसोटी सामन्यात त्याने 14.22च्या सरासरीसह 22 विकेट्स आपल्या नावावर केल्या होत्या. दरम्यान या संपूर्ण मालिकेत त्याने तब्बल 32 विकेट्स घेतल्या.

जसप्रीत बुमराहशिवाय ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार पॅट कमिन्ससह दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेन पेटरसन देखील या शर्यतीत होता. कमिन्सने 3 कसोटी सामन्यात 17.64च्या सरासरीसह 17 विकेट्स घेतल्या, तर पेटरसनने श्रीलंका, पाकिस्तानविरूद्ध कसोटीत 16.92च्या सरासरीने 13 विकेट्स घेतल्या होत्या.

आयसीसी ‘प्लेयर ऑफ द मंथ’ पुरस्कार मिळाल्यानंतर जसप्रीत बुमराहने प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, “डिसेंबर महिन्याच्या आयसीसी ‘प्लेयर ऑफ द मंथ’ पुरस्काराने सन्मानित होणे हे माझ्यासाठी खूप आनंददायी आहे. विशेष करुन जेव्हा वैयक्तिक पुरस्कारासाठी निवड होते, तेव्हा तो क्षण खूप मोलाचा असतो. बॉर्डर-गावसकर ट्रॉफी स्पर्धा आमच्यासाठी सर्वात कठीण होती. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर संघाचे नेतृत्त्व करणे ही देखील खूप अभिमानाची गोष्ट आहे.

जसप्रीत बुमराहच्या आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने कसोटीमध्ये 45 सामन्यात 86 डावात गोलंदाजी करताना 205 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामध्ये एका डावात त्याची सर्वोत्तम गोलंदाजी 27 धावात 6 विकेट्स अशी आहे, तर एका सामन्यांत त्याची सर्वोत्तम गोलंदाजी 86 धावात 9 विकेट्स अशी आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

चॅम्पियन्स ट्राॅफीपूर्वी पाकिस्तानला जाणार कर्णधार रोहित शर्मा? कारण काय?
Champions Trophy; निवडकर्त्यांना यष्टीरक्षक आणि लेग स्पिनरबाबत डोकेदुखी, पाहा कोण-कोण शर्यतीत?
Ashes ODI series; रोमांचक सामन्यात कांगारुंचा विजय, इंग्लंडचा लाजिरवाणा पराभव

Related Articles